सरकार धोक्यात, नाशिकमधील नियोजित कार्यक्रम रद्द करत छगन भुजबळ मुंबईकडे रवाना, शरद पवारांनी बोलावली तातडीची बैठक!

| Updated on: Jun 21, 2022 | 10:27 AM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची बैठक बोलावली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता महाविकास आघाडी सरकारचे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. संजय राऊत देखील आज दिल्ली दाैऱ्यावर होते. मात्र, त्यांनीही आजचा दाैरा रद्द केलायं.

सरकार धोक्यात, नाशिकमधील नियोजित कार्यक्रम रद्द करत छगन भुजबळ मुंबईकडे रवाना, शरद पवारांनी बोलावली तातडीची बैठक!
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : शिवसेनेचे (Shiv Sena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारला आहे. यामुळे राज्यात मोठा राजकिय भूकंप होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे गेल्या काही तासांपासून नॉट रिचेबल आहेत. इतकेच नाही तर शिवसेनेचे इतरही काही आमदार नॉट रिचेबल आहेत. हे सर्वजण गुजरातला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यामुळेच राज्यात आता मोठ्या राजकिय घडामोडी होणार हे नक्की. याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) तातडीने मुंबईकडे रवाना झालेत. भुजबळांचे नाशिक मधील नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करत करण्यात आले.

छगन भुजबळ मुंबईकडे रवाना

शरद पवार यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील त्यांचा दिल्ली दाैऱ्या रद्द केलाय.  छगन भुजबळ यांचे काही नियोजित कार्यक्रम आज नाशिकमध्ये होते. मात्र, राज्यामध्ये सध्या जी राजकिय परिस्थिती निर्माण झालीये, त्यामुळे भुजबळांना सर्व कार्यक्रम रद्द करून मुंबईला तातडीने रवाना व्हावे लागले आहे. शहाजी बापू पाटील, महेश शिंदे, भरत गोगावले, संजय राठोड, महेंद्र दळवी, महेश थोरवे, विश्वनाथ भोईर, संदीपान भुमरे, उदयसिंह राजपूत, संजय शिरसाठ, रमेश बोरणारे, प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार हे शिवसेनेचे आमदार नॉट रिचेबल आहेत.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे यांनी पुकारला बंड

महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचे 56 आहेत, त्यापैकी वरील 13 आमदार हे नॉट रिचेबल असल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये अस्थिरता येऊ शकते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची बैठक बोलावली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता महाविकास आघाडी सरकारचे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. संजय राऊत देखील आज दिल्ली दाैऱ्यावर होते. मात्र, त्यांनीही आजचा दाैरा रद्द केलायं. एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.