बेळगाव : बेळगावसह संपूर्ण सीमा भागात मराठी भाषिकांमध्ये एक नवचैतन्य पसरले आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच समिती आणि मराठी भाषिकांमध्ये एकीच्या नांदीला सुरुवात झाली आहे. समितीने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत तमाम मराठी भाषिकांनी त्याची आज प्रचिती आणून दिली आहे. आज बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांना प्रचंड शक्ती प्रदर्शनाने आपला अर्ज दाखल केला.
हजारो समर्थकांच्या गर्दीत सीमा प्रश्नाच्या घोषणा देत, भगवे ध्वज, भगव्या टोप्या,फेटे आणि शाल घालून विजयी उत्सवाच्या मिरवणुकीप्रमाणे निर्माण झालेल्या वातावरणामुळे आज शहरातील वातावरण मराठमोळे झालेले पाहायला मिळाले .
महानगरपालिकेत अर्ज दाखल केल्यानंतर भव्य मिरवणुकाने सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात झांज पथक ,बैलगाड्या, घोडेस्वार झालेले शिवरायांचे वेशभूषातील मावळे महिलांचा लक्षणीय सहभाग अशा वातावरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून सुरू झालेली मिरवणूक डीसी ऑफिस मार्गे आरटीओ सर्कल होऊन एसपी ऑफिस महानगरपालिकेसमोर येऊन सांगता करण्यात आली
बेळगावमध्ये आज दुखाची गोष्ट अशी आहे की, आज महाराष्ट्रातील भाजपचे जे मंत्री गण किंवा भाजपचे लीडर आज या ठिकाणी मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी भाजपाचा किंवा राष्ट्रीय पक्षाचा प्रचार करायला येत आहेत. त्यांचा आज जाहीर निषेधही व्यक्त करण्यात आला आहे.
कारण त्यांचे जर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मराठी माणसावर, मराठी भाषिकांवर प्रेम करत असतील तर त्यांनी पक्षाचा आदेश न मानता त्यांनी त्या ठिकाणी राहिलं पाहिजे होतं, परंतु तेच आज मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा काम करत आहेत अशी टीकाही या शक्ती प्रदर्शनप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यानी निषेद व्यक्त केला.