भारतात राहायचं असेल तर भारत माता की जय म्हणावेच लागेल : धर्मेंद्र प्रधान

| Updated on: Dec 28, 2019 | 10:34 PM

"भारतात राहायचं असेल तर भारत माता की जय म्हणावेच लागेल", असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan on Bharat mata ki jay slogan) यांनी केले.

भारतात राहायचं असेल तर भारत माता की जय म्हणावेच लागेल : धर्मेंद्र प्रधान
Follow us on

पुणे : “भारतात राहायचं असेल तर भारत माता की जय म्हणावेच लागेल”, असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan on Bharat mata ki jay slogan) यांनी केले. प्रधान आज (28 डिसेंबर) पुण्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 54 व्या महाराष्ट्र प्रेदश अधिवेशनात बोलत होते.

“भारतात राहायचे असेल तर भारत माता की जय हे म्हणावेच लागेल, असं म्हणणारेच देशात राहू शकतील. देशात सध्या एनआरसी, सीसीए आणि लोकसंख्या सूचीवरून रणकंदन माजलं आहे. त्यातच आता देश धर्मशाळा बनतोय जो येईल तो राहील, असं होणार नाही”, असं धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan on Bharat mata ki jay slogan) म्हणाले.

यावेळी बोलताना धर्मेंद्र प्रधान यांनी एनआरसी, सीएए आणि लोकसंख्या सूची वरून विरोधकांना खडेबोल सुनावले. “देशाचे तुकडे करण्याची योजना आखलेल्यांचे अनुयायी आजही विरोध करत असल्याचा आरोप धर्मेंद्र प्रधान यांनी केला.

“चीनमध्ये सरकारच्या विरोधात कोण घोषणाबाजी करु शकतो का, देशात लोकशाही असून मतभिन्नता असू शकते वाद-विवाद होऊ शकतो. मात्र देशात सध्या नागरिकत्व कायदा तसेच लोकसंख्या सूची होऊ की नाही यावरुन वाद-विवाद होत आहे. जगात असा कोणता देश आहे. ज्या देशामध्ये तिथे राहणाऱ्या नागरिकांचा हिशोब ठेवला जात नाही”, असा सवाल प्रधान यांनी केला.

“देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकजणांनी बलिदान दिले. मात्र आता स्वातंत्र्यानंतर लोकसंख्या, नागरिकता कायदा याच्यावर चर्चा होत आहे. देश धर्मशाळा बनतोय जो येईल तो राहील, असं होणार नाही”, असंही प्रधान यांनी सांगितले.