भाजपचं आंदोलन महामोर्चाचा प्रभाव कमी करण्यासाठी? भुजबळ म्हणतात… ये पब्लिक है…

| Updated on: Dec 17, 2022 | 12:38 PM

मुंबईत आज क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडिया इमारतीपर्यंत महाविकास आघाडीचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. तर भाजपानेदेखील मुंबई आणि ठाण्यात माफी मागो आंदोलन केलं.

भाजपचं आंदोलन महामोर्चाचा प्रभाव कमी करण्यासाठी? भुजबळ म्हणतात... ये पब्लिक है...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) मोर्चाचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजपने मोर्चाचं आयोजन केलं आहे. मात्र जनतेला सगळं काही माहिती आहे. ये पब्लिक है.. असं म्हणत  छगन भुजबळांनी (Chagan Bhujbal) महाविकास आघाडीच्या मोर्चाला पूर्णपणे यश मिळणार असल्याचं वक्तव्य केलं. मागील दोन महिन्यापासून आम्ही मागण्या करतोय, मात्र सरकारने त्या ऐकल्या नाहीत. आता आंदोलनाचं (Protest) नियोजन केल्यानंतर भाजपने मागच्या दोन दिवसात आंदोलन आयोजित केलं. आमच्या आंदोलनाला प्रसिद्धी मिळू नये, असा भाजपाचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी केलाय.

मुंबईत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित महामोर्चात छगन भुजबळदेखील सहभागी झाले. महापुरुषांचा अवमान करणारी वक्तव्ये सातत्याने करण्यामागे भाजपाचं मोठं षडयंत्र असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून राज्यात काय सुरु आहे, हे जनतेला ठाऊक आहे. त्यामुळे भाजपच्या आंदोलनाचा महाविकास आघाडीच्या आंदोलनावर फार परिणाम होणार नाही, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

भाजपाच्या राज्यपालांपासून मंत्र्यांपर्यंत लोक चुका करतायत. महाराष्ट्राचा अपमान करतायत आणि माफी आम्ही मागयची, अशी मागणी ते करतायत, हा सगळा त्यांचा दिखावा आहे. फक्त मोर्चापासून लोकांचं लक्ष दूर करण्यासाठी त्यांनी रचलेलं नाटक आहे, असा आरोप छगन भुजबळ यांनी केलाय.

मुंबईत आज क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडिया इमारतीपर्यंत महाविकास आघाडीचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या आघाडीतील महत्त्वाचे नेते आणि लाखोंच्या संख्येने कार्यकर्त्यांचा  सहभाग आहे.

या मोर्चात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार , काँग्रेस नेते नाना पटोले आदी सहभागी होत आहेत. मोर्चापूर्वी छगन भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया दिली.

महाविकास आघाडीचा महामोर्चा हे सरकारचा निषेध करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल आहे. आक्रोश आहे. याची तीव्रता वाढत जाणार. लाखो लोक रस्त्यावर उतरणार त्यामुळे याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटणार, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलंय.