नाशिक : “आतापर्यंत भाजपमध्ये अनेक नेते जात होते. भाजप त्यांच्या आमदारांना लवकरच सरकार येणार असल्याचे चॉकलेट दाखवत होते. मात्र, एकनाथ खडसे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहेत. त्यामुळे या चर्चा बंद होतील.” आता कुठं बॉक्स उघडलाय, भाजपचे अनेक आमदार आणि नेते संपर्कात आहेत लवकरच ते भाजपची साथ सोडतील, असा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. (Chagan Bhujbal said many leaders will quit form BJP in future)
एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले आहेत. भाजपने आता खडसेंची काळजी करु नये. खडसेंना काय मिळणार हे त्यांना आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना माहित आहे. खडसेंनी 40 वर्ष भाजपची सेवा केली. त्यांना गेल्या चार पाच वर्षात भाजपने अपमानित केलं. आमच्याकडून तसे घडणार नाही असं भुजबळ म्हणाले. एकनाथ खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शरद पवार योग्य वेळी त्यांना न्याय देतील, असं सूचक वक्तव्य त्यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. विरोधकांकडून त्यावर टीका होत आहे. सरकारने 50 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केली असती तरी त्यावर विरोधकांनी टीका केली असती. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवयाची आहे, असं भुजबळ म्हणाले. केंद्र सरकारकडून राज्य सरकारचे येणे असलेली रक्कम मिळाली तर शेतकऱ्यांना अजून मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिकमधील ज्येष्ठ नेते विनायक दादा पाटील यांचे निधनानं दु:ख झाल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले. विनायक दादा पाटील यांनी वनक्षेत्र आणि सामाजिक काम मोठ्या प्रमाणात केले होते, अशा भावना भुजबळ यांनी व्यक्त केल्या.
संबंधित बातम्या :
VIDEO | एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
नाथाभाऊंचं राष्ट्रवादीत स्वागत, त्यांचा पक्षाला फायदा होईल: छगन भुजबळ
(Chagan Bhujbal said many leaders will quit form BJP in future)