अजित पवारांची ताकद असती तर फडणवीसांचं सरकार टिकलं असतं : चंद्रकांत पाटील

| Updated on: Dec 17, 2020 | 7:36 PM

अजित पवारांची ताकद असती तर फडणवीसांचं सरकार टिकलं असतं, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला.

अजित पवारांची ताकद असती तर फडणवीसांचं सरकार टिकलं असतं : चंद्रकांत पाटील
ajit pawar chandrakant patil
Follow us on

अहमदनगरअजित पवारांची ताकद असती तर फडणवीसांचं सरकार टिकलं असतं, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला. चंद्रकांत पाटील साईबाबाच्या दर्शनासाठी आले असता त्यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. (BJP Chandraaknt patil Slam DCM Ajit pawar)

“अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर 80 तासांचे सरकार आले त्यावेळी त्यांनी आणलेले आमदार टिकवता आले असते. त्यांच्या आमदारांना त्यांनी सांभाळलं असतं तर सरकार टिकले असते”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“भाजपमधले काही आमदार नाराज आहेत, असं अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या दाव्यावर तुमचं आघाडी सरकार उत्तम चाललंय, आमच्या लोकांना कशाला आकर्षित करता?, असं पाटील म्हणाले. अजितदादा खूप ‌चांगले नेते आहेत. चांगलं काम करतात. गंमत निर्माण होईल अस बोललं तर त्यांची प्रतिष्ठा कमी होईल”, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

“भाजपचे आमदार नाराज असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसंच राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत. तसंच राष्ट्रवादीत लवकरच मोठी महाभरती होणार असल्याचा दावा ते करत आहेत. यावर तुम्ही सरकार चालवा आम्ही विरोधी पक्ष सांभाळू”, असं पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांना संजय राऊत यांच्यावरती पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, “कोण संजय राऊत?”, अशा शब्दात त्यांची खिल्ली उडवली. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि त्यांनी दिलेल्या घटनेतील चौकटींना मानायचे नाही. डॉ. आंबेडकरांच्या घटनेवर देशाचा कारभार उत्तम सुरु आहे आणि पुढेही सुरु राहील. हे सर्व तुम्हांला मान्य नाही का?”, असा सवाल त्यांनी संजय राऊत तसंच शिवसेनेला केला.

ग्रामपंचायत निवडणुकीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढले तर त्यांची ताकद जास्तच होणार. पण आम्हीही ग्रामपंचायत निवडणूका ताकदीने लढवणार. एक मात्र खरं निवडणूक असो वा निर्णय शिवसेना आपलं नुकसान करुन घेत आहे हे मात्र तितकंच खरं”

म”ला चंपा बोललं जात मात्र आम्ही त्यास‌ उत्तर देत नाही. मुख्यमंत्र्यांना उठा आणि शरद पवार यांना शपा असं म्हटलेलं चालेल का?  ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.
निवडणूक संपल्यावर पाच वर्ष एकत्र काम करावं, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.  मात्र गेल्या वर्षात सरकार वाचवण्यासाठी विरोधकांना टार्गेट केलं जातंय. अशा पद्धतीने राग मनात धरुन सरकार चालत नाही”, असं पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या

शिवसेनेच्या पराभवाचीही भरपाई करू : जयंत पाटील

“थपडेवर थप्पड, थपडेवर थप्पड”, भातखळकरांनी सेनेला पुन्हा डिवचलं