घोटाळे बाहेर काढणं आणि तोडपाणी करणं… इम्तियाज जलील यांचा स्वभाव, चंद्रकांत खैरेंनी यादीच दिली….

| Updated on: Dec 29, 2022 | 12:31 PM

लँड कन्व्हर्जनच्या नावाखाली औरंगाबादमध्ये 52 फ्लॅट रुपांतरीत केल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय.

घोटाळे बाहेर काढणं आणि तोडपाणी करणं... इम्तियाज जलील यांचा स्वभाव, चंद्रकांत खैरेंनी यादीच दिली....
Follow us on

औरंगाबादः शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाईंवर (Subhash Desai) घोटाळ्याचे आरोप करणारे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) हे ब्लॅकमेलिंग करतात. अनेकांच्या घोटाळ्यांबद्दल बोलतात आणि सोडून देतात, असा आरोप औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केलाय. खा. जलील यांनी सुभाष देसाईंविरोधात घोटाळ्यांचे आरोप केले आहेत. हे आरोप फेटाळून लावताना खैरे यांनी जलील यांच्यावर टीका केली.

चंद्रकांत खैरे यांनी खा. जलील यांनी आतापर्यंत केलेले घोटाळेविषयक आरोपांची एक यादीच दाखवली. गुटखा, दारू, वक्फ बोर्ड, समांतर योजना असे घोटाळे काढले आणि सोडून दिले, असा आरोप खैरे यांनी केला.

ते म्हणाले, ‘ सुभाष देसाई हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसोबत ते अनेक वर्षांपासून काम करत आहेत. ते काम करताना अभ्यासपूर्ण करतात. जलीलसारखा दुष्ट माणूस जो काहीच काम करत नाही, काही लोकांच्या मदतीने निवडून आलाय. त्यामुळे तो शेफारलाय. पण प्रत्यक्षात जनतेत त्याचं काहीही काम नाहीये.

मी कधी कुणाची मुंडी कापलेली नाही. ब्लॅकमेलिंग केलेलं नाही. त्यामुळे आज जनता माझ्या पाठिशी आहे, असं वक्तव्य खैरे यांनी केलं.

सुभाष देसाईंवर काय आरोप?

महाविकास आघाडी काळात सुभाष देसाई हे औरंगाबादचे पालक मंत्री आणि राज्याचे उद्योग मंत्री होते. या काळात जलील यांनी सुभाष देसाई यांच्यावर 120 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

लँड कन्व्हर्जनच्या नावाखाली औरंगाबादमध्ये 52 फ्लॅट रुपांतरीत केल्याचा आरोप त्यांनी केलाय. चिकलठाणा औद्योगिक भागात 52 प्लॉटचा वापर बदलण्यात आला असून यातील सगळ्यात मोठा एजंट शिवसेना नेते सुभाष देसाई यांचा मुलगा होता, असा आरोप खा. जलील यांनी केलाय.