औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पैठणमध्ये सभा होतेय. यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी भाष्य केलंय. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना प्रश्न विचारलेत. “शिवसेना प्रमुख बाळासाबे ठाकरे यांनी गर्व से कहों हम हिंदू है!, ही घोषणा दिली. ती देशभर गाजली. तुम्ही घोषणा विसरलात काय?” , असा प्रश्न खैरेंनी विचारला आहे. तसंच टेम्पररी मुख्यमंत्री म्हणत खैरेंनी त्यांना डिवचलं आहे.