धनुष्यबाण गोठवणं म्हणजे आमच्या छातीवर बाण मारणं; तसा प्रयत्न केल्यास शिवसैनिक….; चंद्रकांत खैरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा

| Updated on: Sep 07, 2022 | 2:21 PM

धनुष्यबाण चिन्ह गोठवणं म्हणजे आमच्या छातीवर बाण मारल्यासारंख आहे. चिन्ह गोठवलं तर शिवसैनिक आधिक आक्रमक होतील, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाला दिला आहे.

धनुष्यबाण गोठवणं म्हणजे आमच्या छातीवर बाण मारणं; तसा प्रयत्न केल्यास शिवसैनिक....; चंद्रकांत खैरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा
चंद्रकांत खैरे, एकनाथ शिंदे
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई :  आज शिवसेनेने (Shiv Sena) दाखल केलेल्या याचिकांवर घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावनीदरम्यान शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्हं गोठवण्यात यावे अशी मागणी शिंदे गटाच्या वकिलांनी केली आहे. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आता या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 27 सप्टेंबर रोजी ठेवली आहे. शिंदे गटाच्या वकिलांच्या मागणीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी संतप्त प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना इशारा दिला आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवणं म्हणजे आमच्या छातीवर बाण मारल्यासारंख आहे. चिन्ह गोठवलं तर शिवसैनिक अधिक आक्रमक होतील असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

तेच आता शिवसेनेला विसरले

पुढे बोलताना चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं की, ज्यांना शिवसेनेने मोठं केलं, ज्यांना नगरसेवक, आमदार आणि मंत्री केलं तेच आता शिवसेनेला विसरले आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या मागे लागले आहेत.

धनुष्यबाण चिन्ह गोठवणं म्हणजे आमच्या छातीवर बाण मारण्यासारखं आहे. तसा प्रयत्न कोणीही करू नये. तसे झाल्यास शिवसैनिक अधिक आक्रमक होतील असा इशारा त्यांनी यावेळी शिंदे गटाला दिला आहे.

हे सुद्धा वाचा

‘दसरा मेळावा शिवसेनेचाच’

गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. मात्र यंदा शिंदे गटाने शिवसेनेसमोर आव्हान निर्माण केले आहे. शिंदे गट देखील शिवाजी पार्कमध्येच दसरा मेळावा घेण्यासाठी आग्रही आहे.  त्यामुळे यंदा शिवाजी पार्कमध्ये नेमका कोणाचा दसरा मेळावा होणार याकडे राज्यचं लक्ष लागलं आहे. यावर देखील चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

परवानगी मिळाली तरी देखील आणि नाही मिळाली तरीही शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. कोणीही मैदान गोठवण्याचा प्रयत्न करू नये, ते त्यांच्या अंगलट येईल असा इशाराही यावेळी चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाला दिला आहे.

खैरेंचे बाप्पाला साकडे

शिवसेनेच्या वतीने शिंदे गटाविरोधात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत, या सर्व याचिकांचा निकाल हा  उद्धव ठाकरे यांच्यांच बाजुने लागाला यासाठी बाप्पाला साकडे घातले असल्याचंही खैरे यांनी यावेळी सांगितलं.