सांगली : अहिल्याबाई होळकर पुतळा अनावरणप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी कठोर शब्दांत टीका केल्यानंतर आता स्वपक्षातील नेत्यानेच त्यांचे कान टोचले आहेत. भाजचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पडळकर यांना जपून बोलण्याची समज दिली आहे. (Chandrakant Patil advised to Gopichand Padalkar to talk carefully)
“मागेही गोपीचंद यांनी शरद पवारांवर आक्षेपार्ह विधान केले हिते. त्यावेळी त्यांना फडणवीस यांनी समजावून सांगितले होते. आताही त्यांना आम्ही जाहीर सांगतोय की जे ते बोलायचं असतं. पण नीट बोलायचं असतं,” अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पडळकर यांना समज दिली. ते सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी थेट पत्रकार परिषदेत वरील वक्तव्य केले.
जेजुरी येथील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार होते. मात्र, त्याआधीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी 12 फेब्रवारी रोजी पहाटे पाच वाजता काही लोकांच्या मदतीने अहिल्याबाई यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यांनतर महाराष्ट्रात खळबळ उडाली. त्यांच्या या कृतीचे समर्थन करताना त्यांनी शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीकेसोबतच अनेक आरोप केले. ”अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण हे एका चारित्र्यसंपन्न, निष्कलंक माणसाच्या हातून व्हायला हवं ही आमची इच्छा होती. परंतु ज्यांच्या हस्ते उद्घाटन ठेवलं होतं, ते शरद पवार यांचं वागणं, विचार हे अहिल्यादेवींच्या उलट आहेत,” असा युक्तीवाद पडळकर यांनी त्यावेळी केला होता.
तसेच, “पवारांच्या छाताडावर उभं राहून मी निवडणूक लढवली आहे. माझं डिपॉझिट जरी जप्त झालं असेल, तरी मी लेचापेचा नाही. शरद पवार यांनी यशवंतराव होळकर यांचा वाडा सरकारकडे द्यावा. होळकरांच्या सगळ्या वास्तू नेस्तनाबूत करण्याचा उद्योग तुम्ही सुरु आहे. आसा गंभीर आरोपही त्यांनी केला होता. तसेच या मुद्द्यावर गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात चांगलाच वाद झाला होता. दोघेही अरे-तुरेवर आले होते. त्यांनतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर सडकून टीका होत होती. “चोरांसारखे धंदे बंद करा. पवार साहेबांची बरोबरी करायला कित्येक जन्म घ्यावे लागतील,” असा पलटवार राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला होता.
या सर्व प्रकारानंतर गोपीचंद पडळकर यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी पडळकर यांचे आज कान टोचले. त्यांनी पडळकर यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला.
इतर बातम्या:
(Chandrakant Patil advised to Gopichand Padalkar to talk carefully)