मुंबई : राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. तर आमदार मंगलप्रभात लोढा यांची भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपने अधिकृत पत्रक काढून याबाबतची घोषण केली. त्यामुळे रावसाहेब दानवेंऐवजी आता चंद्रकांत पाटील राज्याचे भाजप अध्यक्ष असतील, तर आशिष शेलार यांच्या जागी मुंबई अध्यक्षपदाचा कारभार मंगलप्रभात लोढा हे सांभाळतील.
भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी आजच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मोदींच्या मंत्रिमंडळात रावसाहेब दानवेंकडे राज्यमंत्रिपदाचा भार आहे. ते ग्राहक संरक्षण आणि अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे शालेय शिक्षणमंत्रीपद सोपवण्यात आलं. त्यामुळे शेलार यांच्या जागी मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई अध्यक्षपद देण्यात आलं.
दरम्यान रावसाहेब दानवेंनी पंतप्रधान मोदींना भेटून महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
पक्षात एक व्यक्ती एक पद याअंतर्गत मला अध्यक्षपदापासून मुक्त करावं, अशी विनंती मी पंतप्रधानांना केली. तसंच येत्या काळात नवा पूर्णवेळ अध्यक्ष लवकर नेमावा असंही मी मोदींना सांगितलं, अशी माहिती दानवेंनी दिली.
रावसाहेब दानवे यांचा 2014 मध्येही मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश होता. मात्र त्यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाची धुरा दिल्याने त्यावेळी मंत्रिपद सोडावं लागलं होतं. आता पुन्हा दानवेंची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.
चंद्रकांत पाटील नवे प्रदेशाध्यक्ष
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. या शर्यतीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचं नाव आघाडीवर होतं. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनाही महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांनाच पसंती होती. अखेर त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं.
Chandrakant Patil appointed as the President of Bharatiya Janata Party (BJP), Maharashtra. pic.twitter.com/Qoa8R3VBqX
— ANI (@ANI) July 16, 2019
कोण आहेत चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील यांचा जन्म 10 जून 1959 रोजी एका मध्यमवर्गीय मराठा कुटुंबात झाला. त्यांचे वडील बच्चू पाटील हे मिल कामगार होते. मुंबईमधील प्रभुदास चाळीमध्ये त्यांचे लहानपण गेले. त्यांचे शालेय शिक्षण मुंबईमधील दादर येथील राजा शिवाजी विद्यालय म्हणजेच किंग जॉर्ज शाळेत झाले. फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालयातून 1985 साली त्यांनी पदवी प्राप्त केली.
कोण आहेत मंगलप्रभात लोढा?
संबंधित बातम्या
लोकसभा निवडणुकीपासून घरी गेलो नाही, बायको थेट दिल्लीला आली : दानवे