“राज्यात भाजपचे 6 हजार सरपंच होणार”, चंद्रकात पाटलांचा दावा

| Updated on: Jan 18, 2021 | 6:42 PM

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (18 जानेवारी) घोषित झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकींवर भाजपची भूमिका स्पष्ट करत पत्रकार परिषद घेतली. यावेळी चंद्रकांत पाटलांनी राज्यात भाजपचे 6 हजार सरपंच होतील, असा दावा केलाय.

राज्यात भाजपचे 6 हजार सरपंच होणार, चंद्रकात पाटलांचा दावा
दिग्विजय सिंह यांनी 1.11 लाख रुपये आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी 11 चांदीच्या विटा या राम मंदिरासाठी दिल्या आहेत? की एखाद्या पक्षाला वर्गणीच्या रुपात दिल्या आहेत ? हे काँग्रेसने आपल्या नेत्यांना सुद्धा विचारावं, असा प्रतिप्रश्नही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसला विचारला.
Follow us on

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (18 जानेवारी) घोषित झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकींवर भाजपची भूमिका स्पष्ट करत पत्रकार परिषद घेतली. यावेळी चंद्रकांत पाटलांनी राज्यात भाजपचे 6 हजार सरपंच होतील, असा दावा केलाय. तसेच राज्यात भाजपला कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायतींमध्ये यश मिळालं हेही सांगितलं. महाविकासआघाडीच्या अनेक नेत्यांच्या होमग्राऊंडवर भाजपने यश मिळवल्याचंही चंद्रकांत पाटलांनी नमूद केलं (Chandrakant Patil claim 6 thousand Sarpanch will be of BJP in Maharashtra).

चंद्रकांत पाटील म्हणाले, “भाजपचं ठळक यश म्हणजे शरद पवारांचं दत्तक गाव भाजपनं जिंकलं. जयंत पाटील यांची सासुरवाडी म्हैसाळ ग्रामपंचायत भाजपनं जिंकली. अतुल बाबा भोसले यांच्या नेतृत्वात 52 पैकी 40 गावांमधील ग्रामपंचायती जिंकल्या. एकनाथ खडसे यांच्या गावची ग्रामपंचायतही भाजपच्या ताब्यात आलीय. यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघात 66 पैकी 53 ठिकाणी भाजपने विजय मिळवलाय.”

“कोरोना विषाणूचा संसर्ग होत असताना त्या काळात राज्यात भाजपनं केलेलं काम हे लोकांना भावलं. महाविकास आघाडीनं काहीच दिलं नाही याचा राग लोकांच्या मनात होता. महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. पदवीधर मतदार संघात सत्तेचा दुरूपयोग झाला हे 2 दिवसात सांगेल. याबद्दलचे पुरावे लवकरच देणार आहे. शिवसेना आणि भाजपला हिंदुत्ववादी पक्ष मानतात, पण त्यापैकी लोकांनी आम्हाला निवडलंय. 1665 पैकी 65 बिनविरोध ग्रामपंचायती भाजपच्या आहेत,” असंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

Gram Panchayat Election Results 2021 Maharashtra LIVE | अशोख चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे एकहाती वर्चस्व

Sangli Gram Panchayat Election Results 2021 | सांगलीत काँग्रेसची मुसंडी, सर्वाधिक जागांसह अव्वल स्थान पटकावलं

Ahmednagar Gram Panchayat Election Results 2021: प्रदेशाध्यक्षांच्या गावातच सत्ता गेली, बाळासाहेब थोरातांचा चंद्रकांत पाटलांना टोला

व्हिडीओ पाहा :

Chandrakant Patil claim 6 thousand Sarpanch will be of BJP in Maharashtra