पक्षाचे कार्यकर्ते हेच आमचे सुरक्षाकवच, सुरक्षेची खरी गरज महिलांसह संपूर्ण जनतेला, चंद्रकांत पाटलांची उपरोधिक टीका

| Updated on: Jan 10, 2021 | 6:28 PM

कोणत्याही लोकप्रतिनिधीला कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेची गरज नाही," असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. (Chandrakant Patil Comment On BJP Leader Security Reduce)

पक्षाचे कार्यकर्ते हेच आमचे सुरक्षाकवच, सुरक्षेची खरी गरज महिलांसह संपूर्ण जनतेला, चंद्रकांत पाटलांची उपरोधिक टीका
चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष भाजप
Follow us on

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत राज्य सरकारने कपात केली आहे. यावरुन भाजपच्या अनेक नेत्यांकडून महाविकासआघाडी सरकारवर टीका केली जात आहे. “लोकप्रतिनिधींना सुरक्षेची गरज नाही. राज्य सरकारने हीच सुरक्षा जनतेला आणि महिलांना द्यावी,” असा उपरोधिक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. नुकतंच त्यांनी याबाबतचे ट्वीट केले आहे. (Chandrakant Patil Comment On BJP Leader Security Reduce)

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

“महाविकासआघाडी सरकारने माझी आणि काही लोकप्रतिनिधींची सुरक्षा हटवली आहे. त्यासाठी सरकारचे आभार! राज्यात कायदा आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही दोघेही राज्य सरकारला विनंती करतो की, जोपर्यंत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ठीक होत नाही, महिलांना पुरेसे संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीला कोणत्याही सुरक्षा व्यवस्थेची गरज नाही,” असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

“आम्हा सर्वांच्या सुरक्षा ताफ्यातून ज्या पोलीस जवानंना वगळण्यात आलं आहे. त्यांना महिला सुरक्षेचा विशेष कार्यभार देऊन गुन्हेगारांमध्ये पोलिसांची भीती निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. सुरक्षेची खरी गरज लोकप्रतिनिधींना नसून जनतेला आणि महिलांनाच आहे,” असेही त्यांनी सांगितले.

“पक्षाचे कार्यकर्ते हेच आमचे सुरक्षा कवच आहेत. त्यामुळे आमची काळजी न करता राज्यातील सुव्यवस्था नीट राहावी, याकडे राज्य सरकारने लक्ष दिलं पाहिजे.”

“पत्रकार आणि राज्य सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दाबल्यामुळे न्यायालयाकडून सतत सरकारवर वाभाडे निघत असतात. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात पोलिसांची उर्जा वाया न घालवता ती इतर ठिकाणी वापरण्यात यावी,” अशी अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.

(Chandrakant Patil Comment On BJP Leader Security Reduce)

“महाराष्ट्रात होणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटना कमी करा”

राज्य सरकारने सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं स्वागतल करतो. महाराष्ट्रात महिला खूप असुरक्षित झालेल्या आहेत. त्यामुळे कपात केलेली सुरक्षा महिलांच्या सुरक्षेत वापरायला हवी, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

जर सरकारची सुरक्षा काढण्यामागे अशी कल्पना असेल की, आमचे प्रवास थांबतील, आम्ही घाबरु, तर आम्ही चळवळीतील माणसे आहोत. सुरक्षा काढल्याने आम्ही घाबरत नाहीत. कार्यकर्त्याचं सुरक्षा कवच हे गावोगाव आहे. सामाजिक आणि राजकीय कामाला सुरुवात केली त्याचवेळी हे गृहित धरलं होतं की, कुठेतरी गाडी अडवली जाणार, कुठेतरी निदर्शने होणार. त्यामुळे आम्ही काही त्याची काळजी करत नाहीत. पण जे सुरु आहे ते आकसाने आणि सूडबुद्धीने सुरु आहे. यामधून काही निष्पन्न होईल, असं वाटत नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

तुम्ही असं केलं होतं तर आम्ही असं करणार, असं करायचं असेल तर आमची याबाबत काही तक्रार करत नाही आहोत. उलट आम्ही स्वागतच करत आहोत. महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटना वाढत चालला आहे. महिलांची सुरक्षा वाढवा आणि महाराष्ट्रात होणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटना कमी करा. कोरोना काळात मी स्वत:हून सुरक्षा सोडली होती, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

‘या’ नेत्यांच्या सुरक्षेते कपात 

>  विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस, मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची सुरक्षा महाराष्ट्र सरकारने कमी केली आहे.

>  फडणवीसची सुरक्षा झेड + होती ती आता वाय + केली आहे.

>  अमृता फडणवीस यांची सुरक्षा अगोदर वाय + ती आता एक्स केली आहे.

>  देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात यानंतर बुलेटप्रूफ कार नाही.

>  राज ठाकरे यांच्याकडे पूर्वी झेड सुरक्षा होती. जी आता Y + करण्यात आली आहे.

>  रामदास आठवलेंची वाय + सुरक्षा आत्ता विना एस्कॉर्टशिवाय असेल.

>  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार नारायण राणे यांच्याकडे वाय + सुरक्षा होती जी आता रद्द करण्यात आली आहे.

          >  भाजप नेते आशिष शेलार यांना वाय + सुरक्षा होती. ती आता वाय करण्यात आली आहे.

(Chandrakant Patil Comment On BJP Leader Security Reduce)

संबंधित बातम्या : 

फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांतदादांच्या सुरक्षेत कपात; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

राणे, चंद्रकांतदादांची वाय प्लस सुरक्षा रद्द; आठवलेंना एस्कॉर्टशिवाय वायप्लस सुरक्षा