सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत; अजितदादांवर टीका करताना चंद्रकांतदादांची जीभ घसरली

| Updated on: Oct 10, 2020 | 9:32 PM

"पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील, तर यासंदर्भात ऊर्जा वायाला घालवू नका. आम्ही पण तुमचे बाप आहोत,"

सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत; अजितदादांवर टीका करताना चंद्रकांतदादांची जीभ घसरली
चंद्रकांत पाटील आणि अजित पवार
Follow us on

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची (Chandrakant Patil Criticize Ajit Pawar) जीभ घसरली आहे. “सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत”, अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांवर टीका केली (Chandrakant Patil Criticize Ajit Pawar).

“पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील, तर यासंदर्भात ऊर्जा वायाला घालवू नका. आम्ही पण तुमचे बाप आहोत,” अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना टोला लगावला. कोथरुड येथे भारतीय जनता पक्षाच्या व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पार पडल्या, यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.

राज्यातील हे सरकार दिशाहीन सरकार – चंद्रकांत पाटील

“राज्यातील हे सरकार दिशाहीन सरकार आहे. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आधीच का घेतला नाही, सरकारमध्ये कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. मुख्यमंत्री तर मातोश्री मध्येच बसलेले असतात”, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले (Chandrakant Patil Criticize Ajit Pawar).

“मराठा समाजाला न्याय कधी मिळणार, सुप्रीम कोर्टात जाऊन स्टे कधी उठवणार, एक महिना झाला पण हे सरकार काहीही करत नाही. हे, सरकार कोव्हिड बाबत गंभीर नाही, शेतकरी प्रश्नाबाबत, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत गंभीर नाही. विद्यार्थ्याबाबत गंभीर नाही”, असा आरोपही यावेळी त्यांनी केला.

वडेट्टीवारांनी आधी ओबीसी समाजाला विचारावं त्यांना चालणार आहे का? – चंद्रकांत पाटील

“मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाकणे हे मराठा समाज आणि ओबीसी समाज दोघांसाठी चुकीचे ठरेल. मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करा, असे वडेट्टीवार बोलले असतील तर त्यांनी आधी ओबीसी समाजाला विचारावे चालणार आहे का. असे झाले तर गावो गाव संघर्ष होतील”, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. तसेच, राज्यात लवकरच भाजपचं सरकार येईल. या भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे.पी. नडा यांनी केलेल्या विधानाबाबत विचारले असता त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला, असल्याचे पाटील म्हणाले.

Chandrakant Patil Criticize Ajit Pawar

संबंधित बातम्या :

निवडणूक आयोगाकडून शिवसेनेला ‘बिस्कीट’, आम्हाला ते चिन्ह नको, सेनेची भूमिका

भाजपच्या काळात सर्वाधिक बलात्कार, 66 बलात्कारी आरोपींना भाजपचं तिकीट : रुपाली चाकणकर

तुम्ही कुणाच्या कडेवर आहात हे विचारणार नाही; रोहित पवारांचा पडळकरांवर प्रतिहल्ला