पुणे : राज्याचे तंत्र व उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज पुण्यात बोलताना दहीहंडी खेळाबाबत स्पष्टीकरण दिलंय. आरक्षण दिलेलं नाही, तर दहीहंडी (Dahihandi) खेळ नव्याने अॅड केला, उद्या मंगळागौर-विटी दांडूलाही मान्यता मिळू शकते, त्यात अयोग्य काय? असा सवाल त्यांनी केलाय.”एखाद्या निर्णयाचा अभ्यास करण्यापूर्वीच बोलणं सुरू केलं जातं आधीच राज्यात खेळामध्ये आरक्षणाचा कायदा आहे. खेळामधील 5 टक्के आरक्षण आधीच सगळ्या जातींना आहे. आधी जे खेळ यात होते त्यात हा एक खेळ जोडला गेला आहे. त्यात कुठलीही अधिकच आरक्षण दिलं नाही. फक्त नवा खेळ जोडला आहे. तशी कुणी विटी दांडू आरक्षणात जोडण्याची मागणी केली तर तोही जोडू. सगळ्या गोष्टी सोप्या असताना त्या अवघड करून समाजाची दिशाभूल केली जात आहे. कुणी मागणी केली तर मंगळागौर देखील यात जोडू”, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
दहीहंडी म्हटलं तरूणाईमध्ये उत्साह संचारतो. याच दहीहंडीला आता खेळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. दहीहंडीचा समावेश खेळामध्ये करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना ही घोषणा केली आहे. यासंदर्भात सरकारी आदेशही काढण्यात आला आहे. प्रो कबड्डी लीगप्रमाणे आता प्रो दहीहंडी स्पर्धा सुरू केल्या जाणार आहेत. दहीहंडी खेळणाऱ्या गोविंदाना सरकारी नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे. सरकारी नोकरीमध्ये गोविंदाना 5 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. या शिवाय दहीहंडी दिवशी सार्वजनिक सुट्टीही मिळणार आहे.
देशात प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा आणि मागणी करण्याचा अधिकार आहे. पण देवेंद्र फडणवीस जातीपातीच्या वर येऊन त्यांच्या स्वतःचा कर्तुत्वावर आले आहेत. पक्ष त्यांच्या कर्तृत्वाचा विचार नेहमीच करतं.अनेक समजाच्या मागण्या असतात की काही योजना किंवा महामंडळ करता येतील का? त्यामुळे अमृतची योजना आणली पण आमचं सरकार गेलं. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी यावर खूप काम करायला सुरुवात केलं आहे. अमृतसाठी महामंडळ निर्माण करू. अधिवेशन एकदा झालं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी स्वतः यासाठी एक बैठक घेण्याचा आग्रह करणार आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणालेत.