मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना आपल्या नेत्यांविरुद्ध होणाऱ्या अपप्रचाराला आक्रमक प्रत्युत्तर द्या, असं आवाहन केलं आहे (Chandrakant Patil suggest BJP activist). मागील काळात अनेकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. त्याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांनी भाजप कार्यकर्त्यांना आक्रमक होण्याचे आदेश दिले आहेत. ते भाजपा प्रदेश पदाधिकारी बैठकीत बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “फेब्रुवारीमध्ये नवी मुंबईत झालेल्या अधिवेशनात पक्षाने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. पक्षाच्या आंदोलनामुळे सरकारला नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार करणे भाग पडले. या पुढील काळात दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रखर आंदोलन उभे केले पाहिजे. यातून कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा गैरकारभार जनतेपर्यंत नेणेही आवश्यक आहे. आपल्या नेत्यांविरुद्ध होणाऱ्या अपप्रचाराला कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन उत्तर द्यावे.”
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
“लॉकडाऊन काळात महाराष्ट्रात आपल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सेवा कार्यात सहभाग घेतला. आता या पुढील काळातही कार्यकर्त्यांनी विविध माध्यमातून जनतेची मदत केली पाहिजे. मोठ्या प्रमाणात स्क्रिनिंग होण्यासाठी आणि विलगीकरण केंद्रे सुरु करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. रुग्णांची सेवा अधिकाधिक पद्धतीने करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कार्यरत राहिले पाहिजे,” असंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.
या बैठकीत प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक यांनी आगामी काळात पक्षातर्फे राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी आघाडी सरकारवर कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याकडे दुर्लक्षा केल्याचा आरोप केला. तसेच या बैठकीत आघाडी सरकारचा निषेध करणारा ठराव मांडला. किसान मोर्चाचे प्रमुख डॉ. अनिल बोंडे, माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी या ठरावाला अनुमोदन दिलं, अशी माहिती कार्यालयीन सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी दिली.
हेही वाचा :
मी महाराष्ट्रापासून दूर कशी जाईन? : पंकजा मुंडे
आम्ही सरकार पाडणार नाही, तुम्हीच ते चालवून दाखवा : देवेंद्र फडणवीस
Chandrakant Patil suggest BJP activist