कोल्हापूर: ओबीसी आरक्षणावर जनगजागृती करण्यासाठी राष्ट्रवादी राज्यभर जनजागृती करणार असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट पवारांनाच आव्हान दिलं आहे. खोटं सांगण्यासाठी सभा घेतल्या तर आम्हीही पोलखोल सभा घेऊ, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. (chandrakant patil take a dig at sharad pawar over obc reservation)
चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणाबाबत उपस्थित केलेले मुद्दे खोडून काढले. तसेच शरद पवार खोटं बोलत असल्याने मला पत्रकार परिषद घ्यावी लागल्याचेही त्यांनी सांगितलं. शरद पवार आज आरक्षणावर जे बोलले त्यावरून मती गुंग झाली आहे. खऱ्याचा सामना करता येत नसेल तर अशी निती वापरली जाते. मधली 16 वर्षे सोडली तर 58 वर्षे यांचेच राज्य होते. त्यावेळी ओबीसींना आरक्षण देण्यासाठी कुणी हात बांधले होते का?, असा सवाल करतानाच मराठा समाजाला आरक्षण देण्याची यांची इच्छा नाही. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलाय यात 6 वेळा कमिशन स्थापन केली. मात्र 6 वेळा मागास आयोगाचे अहवाल तुम्ही का स्वीकारला नाही? असा सवाल पाटील यांनी केला.
पुनर्विचार याचिका दाखल करण्यास यांनी वेळ लावला. कोर्टाला विनंतीही केली नाही. 50 टक्के आरक्षण दिलं तरी काम करावं लागेल. त्यामुळे राज्य सरकार खोटं बोलत आहे, असं सांगतानाच आमची सुद्धा जातीनिहाय जनगणना करण्यास संमती आहे, असं ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण टिकवले होते. ते तुम्हाला का जमलं नाही? लोकांना खोटं सांगण्यासाठी सभा घेतल्या तर त्यापाठोपाठ आमच्या सभा देखील होतील. गावोगाव जाऊन खोटं सांगणार असतील तर आम्ही पोलखोल सभा घेणार. राज्यभर सभा घेतल्या जातील. हे सगळं प्रकरण अंगावर शेकल्यामुळे अशी वक्तव्य केली जात आहेत, असं सांगतानाच सर्वांना मंत्रायलयात बोलवा समोरासमोर होऊन जाऊ दे काय खरं आणि काय खोटं, असं थेट आव्हानच त्यांनी महाविकास आघाडीला दिलं.
पत्रं आधीच गेलं आहे. राज्यपालांचं वय झाल्याने त्यांना दिसलं नसेल, असं विधान शरद पवार यांनी केलं होतं. त्यालाही पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. राज्यपाल यांचं वय झालं आणि पवार साहेब यांचं वय झालं नाही का? कुणी कुणाच्या वयावर बोलू नये. सदस्यांची नियुक्ती करायची की नाही हा राज्यपालांचा अधिकार असल्याचे कोर्टाने देखील म्हटलं आहे, असं ते म्हणाले.
केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा निघणार आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नारायण राणे यांच्या दौऱ्याने शिवसेनेला शह बसत असेल तर ते बाय प्रॉडक्ट् आहे. मोदींनी सांगितल्या प्रमाणे नवीन मंत्री दौरे करत आहेत. मुंबईत शिवसेनेला शह मिळत असेल तर तो त्यांचा प्रश्न, असा टोलाही त्यांनी लगावला. (chandrakant patil take a dig at sharad pawar over obc reservation)
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 16 August 2021 https://t.co/N83KSL50Ad #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 16, 2021
संबंधित बातम्या:
जेवणाचं निमंत्रण दिलं पण हात बांधले, केंद्राकडून ओबीसींची शुद्ध फसवणूक, शरद पवारांचा हल्लाबोल
संजय राऊतांना मार्शलने भर संसदेत उचललं, तो सदस्यांवरील हल्लाच होता; शरद पवारांनी सांगितली आँखो देखी
ओबीसींना आरक्षण कसे मिळणार?; शरद पवारांनी सांगितल्या कायद्याच्या 3 गोष्टी!
(chandrakant patil take a dig at sharad pawar over obc reservation)