शिवसेनेसाठी प्रयत्न करु, पण धनंजय महाडिकांवर आमचं प्रेम: चंद्रकांत पाटील

| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभेची जागा शिवसेनेचीच आहे. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन. पण धनंजय महाडिक यांच्यावर आमचं प्रेम आहे, असं वक्तव्य करुन चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात थेट युती झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराबद्दल सहानुभूती व्यक्त केली. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्या मंचावर, चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्याचं […]

शिवसेनेसाठी प्रयत्न करु, पण धनंजय महाडिकांवर आमचं प्रेम: चंद्रकांत पाटील
Follow us on

कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभेची जागा शिवसेनेचीच आहे. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन. पण धनंजय महाडिक यांच्यावर आमचं प्रेम आहे, असं वक्तव्य करुन चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात थेट युती झाली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराबद्दल सहानुभूती व्यक्त केली.

महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्या मंचावर, चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्याचं भाष्य केलं. पण त्याचवेळी चंद्रकांत पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचीच जास्त चर्चा आहे.  कोल्हापुरात धनंजय महाडिक यांच्या भिमा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनादरम्यान चंद्रकांत पाटील बोलत होते.

यावेळी बोलताना दादांनी ‘सैराट’मधल्या सिनेमाचे उदाहरण दिले. आपल्या मुलीने दुसऱ्या मुलाशी मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून त्याच्या आई-वडिलांनी त्या दोघांनाही मारण्याची सुपारी दिली. जर मी त्या ठिकाणी असतो तर मी रागावलो असतो, शिव्या घातल्या असत्या, मग म्हटलं असतं ठीक आहे, तिने आता लग्न केलं आहे, सगळं विसरून तिचा संसार सुखाचा होईल असं म्हटलं असतं. बायकोला म्हटलं असतं आपलीच मुलगी आहे, घेऊन टाका घरी. तसं धनंजय महाडिक यांनी आमच्या मनाप्रमाणे लग्न केलं असतं, तर बरं झालं असतं. पण त्यांनी मनाविरुद्ध लग्न करुन सुद्धा ते आमची मुलगीच आहेत. त्यामुळे ती सुखात राहावी. मी शिवसेनेचा प्रचार करेन, सेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेन, परंतु हे आहेच की आमच्या घरातील मुलगी (धनंजय महाडिक) आमच्या मनाविरुद्ध दुसऱ्या घरात गेली, तरी तिच्यावर आमचं प्रेम आहेच. काळाच्या ओघात काय घडलेलं असतं कोणालाचा माहीत नसतं. राजकारणात एका रात्रीत बदल होत असतात. – चंद्रकांत पाटील

कोल्हापूरमध्ये 2014 च्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय मंडलिक यांचा पराभव केला होता. त्यावेळी मोदी लाटेतही राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक निवडून आले होते. त्यावेळीही शिवसेना भाजपची युती होती. त्यामुळे युती झाली आणि जागावाटप झाल्यास कोल्हापूरची जागा शिवसेनेची आहे हे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर मान्य केलं. तसंच युती होणारच असा पुनरुच्चारही केला.

VIDEO: 

कोल्हापूर लोकसभा : धनंजय महाडिकांच्या उमेदवारीला हसन मुश्रीफांचा विरोध

दुसरीकडे शिवसेनेने अद्याप युतीबाबत अजूनही काहीही भाष्य केलं नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र लढण्याची घोषणा केली होती. मात्र भाजपने सातत्याने शिवसेनेसोबत युती करण्याची भाषा केली आहे. दरम्यान, निवडणुकीपूर्वी येत असलेल्या ओपिनियन पोलमध्ये युती न झाल्यास दोन्ही पक्षांना फटका बसेल असा अंदाज आहे.

2019 मधील पहिला सर्व्हे

लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक एजन्सीचे सर्व्हे, ओपिनियन पोल जाहीर होत आहेत. या वर्षातील सर्वात ताजा ओपिनियन पोल व्हीडीपी असोसिएशनने केला आहे.

व्हीडीपी असोसिएशनच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जादू कायम असल्याचं दिसतंय. कारण महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी तब्बल 23 जागा भाजप जिंकेल असा अंदाज या सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे. युतीशिवाय भाजपला या जागा मिळतील असा अंदाज आहे. दुसरीकडे या निवडणुकीत सर्वात मोठा फटका शिवसेनेला बसेल असा अंदाज आहे. कारण गेल्यावेळी तब्बल 18 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेला केवळ दोन जागा मिळतील असा अंदाज आहे.

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात शिवसेनेला केवळ 2 जागा, भाजपला देशात मोठा फटका: सर्व्हे  

कोल्हापूर लोकसभा: विरोधक कुणीही असो, लढत मुन्ना विरुद्ध बंटीच!

उत्तर भारतात काँग्रेस नाही, ‘इतर’ पक्ष भाजपसाठी डोकेदुखी ठरणार! 

शिवसेना-भाजप विधानसभा-लोकसभा एकत्रच लढणार : अमित शाह 

आज निवडणुका झाल्यास देशातलं चित्र काय? पाहा राज्यनिहाय निकाल 

युती न झाल्यास उलट आमची एक जागा जास्तच येईल : रावसाहेब दानवे