अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक आम्ही जिंकूच, शिवाय ‘इतकी’ टक्के मतं घेऊ- चंद्रशेखर बावनकुळे

| Updated on: Oct 14, 2022 | 12:35 PM

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील विजयावर भाष्य केलंय. वाचा...

अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक आम्ही जिंकूच, शिवाय इतकी टक्के मतं घेऊ- चंद्रशेखर बावनकुळे
Follow us on

राहुल झोरी, प्रतिनिधी, मुंबई : रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेली अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक (Ruruja Latke) होतेय. या निवडणुकीकडे सर्वांचंच विशेष लक्ष आहे. शिंदेगटाच्या बंडानंतर ही पहिली निवडणूक होतेय. त्यामुळे ही निवडणूक ठाकरे आणि शिंदे दोन्हीगटासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. अशात या निवडणुकीतील विजयावर दोन्हीबाजूने दावा केला जातोय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही या निवडणुकीतील विजयावर भाष्य केलंय.

मुरजी पटेल उमेदवारी जाहीर केली आहे. ते निवडणूक अर्ज भरायला जात आहेत. माझ्यासह अन्य भाजप नेते त्यांच्यासोबत हा फॉर्म भरायला जात आहेत. आम्हीच जिंकू असा आम्हाला ठाम विश्वास आहे. शिवाय 51% मत घेऊ आणि अंधेरी पूर्व विधानसभेची निवडणूक जिंकू, असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केलाय.

शिंदेगटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरूनच बरंच राजकारण झालं. त्यावर बोलताना लटके यांच्या राजीमान्याशी आमचा काहीही सबंध नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

उद्धव ठाकरे मशाल घेतली. अडीच वर्ष राष्ट्रवादी-काँग्रेसबरोबर युती केली. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस बरोबर त्यांनी हात मिळवणी केली. मशाल काँग्रेसच्या हाती आहे. त्याच हातात घड्याळ आहे! त्यामुळे त्यांना मतदार मतदान करणार नाहीत. बाळासाहेबांची शिवसेना शिंदे साहेब नेतृत्वात काम करत आहे. ही सेना उद्धव ठाकरेंची मशाल विझवल्याशिवाय राहणार नाहीत, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

शिवसेना आणि काँग्रेसमधून नगरसेवकांनी भजपमध्ये प्रवेश केला आहे. अवधूत तटकरे हे कोकण रायगडमधील खंबीर नेतृत्व आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडून भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे, असं बावनकुळे म्हणाले आहेत.