नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीनिमित्त माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule on Shiv Sena ) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडीने भाजपसमोर आव्हान उभं केलं आहे. (Chandrashekhar Bawankule on Shiv Sena ) या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचीत करताना, भाजपचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला. त्याचवेळी त्यांनी ठाकरे सरकारच्या खातेवाटपावर भाष्य करत, काँग्रेस नेते आणि राज्याचे ओबीसी, खार जमिनी विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर अन्याय झाल्याचा दावा केला. इतकंच नाही तर नाराज विजय वडेट्टीवार भाजपात आलेच तर त्यांचे स्वागत आहे. वडेट्टीवार यांच्यावर अन्याय झाला आहे, असंही बावनकुळे म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारने खातेवाटपात विदर्भावर अन्याय केला. विजय वडेट्टीवार यांना दुय्यम खाते मिळाले, असं बावनकुळेंनी नमूद केलं.
… तर शिवसेनेला सोबत घेता येईल : चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता येणार. जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी गरज भासल्यास शिवसेनेला सोबत घेता येईल, पण तो निर्णय सेनेनं घ्यायचा आहे, असं म्हणत, बावनकुळे यांनी नागपूरमध्ये शिवसेनेला सोबत घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी करुन राज्यात सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे शिवसेना नागपूरमध्ये भाजपसोबत जाणार का हा प्रश्न आहे.
नागपुरात महाविकास आघाडीच जिंकणार : काँग्रेस
दरम्यान, नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेस – राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळेल. विधानसभेत नागपूर जिल्ह्यातील जनतेनं भाजपविरोधात कौल दिलाय, तोच कौल जिल्हा परिषदेतही कायम राहील, असा विश्वास काँग्रेस नेते आणि नवनिर्वाचित मंत्री क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केला.
विजय वडेट्टीवार यांच्या नाराजीवर पक्ष नेतृत्त्व बोलेल. जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानामुळे आज कॅबिनेट बैठकीत जाणार नाही, असंही केदार यांनी स्पष्ट केलं.
नागपूर जिल्हा परिषद निवडणूक
नागपूर जिल्हापरिषदेची निवडणूक अडीच वर्ष उशिराने होत आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या 58 गटांसाठी 270 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपची सत्ता या जिल्हा परिषदमध्ये आहे. मात्र आता राज्यातील सत्तांतरामुळे जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीने चांगलीच मोर्चेबांधणी केली.
2012 मधील पक्षीय बलाबल
भाजप – 21
काँग्रेस – 19
शिवसेना – 08
राष्ट्रवादी – 07
बसप – 03
संबंधित बातम्या
नागपूर, अकोला, पालघरसह 6 जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा, सर्व माहिती एका क्लिकवर