लोकसभा-विधानसभांसाठी भाजपचा झटून प्रचार, शिंदे गटाला सोबत घेणार? प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं….

| Updated on: Jan 03, 2023 | 1:10 PM

लोकसभेच्या महाराष्ट्रातील लोकसभा-विधानसभेच्या सर्वच जागांसाठी भाजप जोरदार प्रयत्न करणार आहे.

लोकसभा-विधानसभांसाठी भाजपचा झटून प्रचार, शिंदे गटाला सोबत घेणार? प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं....
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः आगामी लोकसभा (Loksabha), विधानसभा तसेच महापालिका निवडणुका ताकतीने लढवण्यासाठी भाजपची (BJP) तगडी टीम कामाला लागाली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यातील ४५ जागा मिळणारच, अशी घोषणाच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली होती. त्यामुळे राज्यात शिंदेंसोबत युतीत असलेला भाजप आगामी निवडणुकांमध्ये युतीनुसार लढणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. शिंदे गटाच्या मंत्र्यांनाही भाजपच्या या अजेंड्यावरून वारंवार डिवचण्यात आलं. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रश्नाचं स्पष्ट उत्तर दिलं.

लोकसभेच्या महाराष्ट्रातील 48 जागांसाठी भाजप जोरदार प्रयत्न करणार आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका शिंदे गटासोबत युती करूनच लढणार आहोत, असं बावनकुळे यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे शिंदे गटाचा उमेदवार ज्या ठिकाणी उभा करणार त्याठिकाणी आम्ही जास्त ताकद लावू, युतीचा उमेदवार विजयी करू, असं आश्वासन बावनकुळे यांनी दिलंय.

भिवंडी येथील पत्रकार परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, शिंदे फडणवीस यांच्या समन्वयाने महाराष्ट्रातल्या लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत प्रत्येक निवडणुका आम्ही एकत्र लढू आणि ५१ टक्के मतं घेण्याचा प्रयत्न करू. जिथे शिंदेंचे उमेदवार असतील तिथे आम्ही ताकदीने मदत करू…

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा प्रवास सुरु केला आहे. काल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा चंद्रपुरात आणि औरंगाबादेत दौरा झाला. राज्याचा 80टक्के दौरा पूर्ण झाला असून जानेवारी अखेरपर्यंत उर्वरित दौरा पूर्ण होईल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.
भाजपच्या नेत्यांनी आत्तापर्यंत 45 जिल्ह्यांचा प्रवास केला आहे. राज्यात 25लाख युवा वॉरीअर्स काम करणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. केंद्र सरकारच्या विविध योजना किती प्रभावी आहे, हे ठसवण्याचा प्रयत्न या यात्रांमधून होतोय.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘ महाराष्ट्रात केंद्राचे 7 कोटी लाभार्थी असून त्यापैकी २ कोटी लाभार्थी मोदींजींना धन्यवाद म्हणून पत्र देणार आहेत; आत्तापर्यंत 35 लाख महिलांनी पत्रं दिली आहेत..

उद्धव ठाकरेंवर निशाणा

या पत्रकार परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकार 18 तास काम करतं.. एक काळ होता की फक्त फेसबुकवर सरकार चालू होतं… 18 महिने मंत्रालयाने मुख्यमंत्री पाहिले नव्हते.. मदारांच्या पत्रांवरही मुख्यमंत्री सह्या करत नव्हते.

दहीहंडीसाठी कोरोना होता, पण आयपीएल साठी नव्हता, नागपूर अधिवेशनासाठी कोरोना होता.. असंही सरकार महाराष्ट्राने पाहिलं आहे, अशी बोचरी टीका ठाकरे सरकारवर करण्यात आली.