नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे (NCP) जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) सध्या चर्चेत आहे. सरस्वती माता आणि सावित्रीमाई यांच्या बद्दल केलेल्या विधानावरून त्यांच्या जहरी टीका होत आहे. त्यांच्या नाशिकच्या (Nashik) निवासस्थानाच्याबाहेर निदर्शने देखील करण्यात आली आहे. याशिवाय त्यांना विविध व्यक्तींनी त्यांना मेसेज केल्याचे त्यांनी स्वतः पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे. त्यात मात्र निगेटिव्ह मेसेज (SMS) येत असल्याचे भुजबळांनी सांगत मला छगन लाल, चिक्की खाय – बिक्की खाय असे मेसेज येत असल्याचे म्हंटले आहे. छगन भुजबळ यांच्यासह तिघांच्या विरोधात धमकीचा गुन्हा दाखल केलेल्या फिर्यादी ललित टेकचंदाणी यांनी हे मेसेज केल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे. ललित टेकचंदाणी यांनी मला व्हिडिओ सेंड करून मी हिंदु, राष्ट्रप्रेमी, भारतीय जनता पक्षाचा असल्याचे म्हंटले आहे. पण हे मला कधीही दिसलं नाही म्हणत भुजबळांनी टेकचंदाणी यांच्या आरोपाचे खंडन केले आहे.
छगन भुजबळ आणि त्यांच्या दोन समर्थकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी नाशिक येथील भुजबळ फार्म या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.
यावेळी छगन भुजबळ यांनी गुन्हा दाखल केलेले ललित टेकचंदाणी यांचा मी नंबर डिलिट केला असून सात-आठ वर्षे झाली मी त्यांच्याशी बोलत नाही असा दावा केला आहे.
ललित टेकचंदाणी हेच मला सारखा मेसेज करून त्रास देत असल्याचे भुजबळ यांनी म्हंटले आहे. याशिवाय टेकचंदाणी मला छगन लाल चिकी खाय बिकी खाय असे मेसेज करत असल्याचं म्हंटले आहे.
ललित टेकचंदाणी यांनी आमच्यावर बऱ्याच केसेस केल्या असून काहींमधून आम्ही बाहेर पडलो आहोत काही अजून सुरू आहे असेही भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
टेकचंदाणी हे आधी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत काम करायचे नंतर ते आमच्यासोबत करायचे पण नंतर त्यांच्या तक्रारी आल्या होत्या म्हणूईन त्यांना बाजूला केल्याचे भुजबळ यांनी म्हंटले.
याच रागातून ते आम्हाला त्रास देत असल्याचा दावा भुजबळ यांनी करत मी त्यांना धमकी दिली नाही, याबाबत मी तक्रार करणार नसून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिले असल्याचे सांगितले.
एकूणच ललित टेकचंदाणी यांना मी धमकी दिली नसून कार्यकर्त्याणे त्यांना मेसेज करून विचारणा केली असल्याचे भुजबळ म्हणाले आहे.