मुंबई : “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबात काही वाद नाही. पवार साहेबांनी याबद्दल आधीच सांगितलं आहे. त्यामुळे त्यावर मी बोलण्याची गरज नाही,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. तसेच ‘नया है वह’ असा टोलाही त्यांनी शरद पवार यांचे नातू पार्थ पवार याला लगावला. (Chhagan Bhujbal on Sharad Pawar criticize Parth Pawar)
पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना शरद पवार यांनी पार्थ पवारांवर टीका केली. “माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे”, असं शरद पवार म्हणाले होते.
त्यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले, “पार्थ इमॅच्युअर आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत. त्याला हिंदीत ‘नया है वह’ असं म्हणतात. उपमुख्यमंत्री अजित पवार दुखावले गेले नाही. आम्ही सर्व एक कुटुंब आहोत. कुटुंबातील लोकांना आपण असं बोलत असतो, समजावत असतो. लहान आहे, ठीक आहे. त्यांनी काही म्हटलेलं नाही.”
“मी शरद पवारांना काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयाबद्दल माहिती सांगण्यासाठी गेलो होतो,” असेही भुजबळांनी यावेळी सांगितले.
“आमच्या संपर्कात भाजपचे काही आमदार असतील तर आम्ही काही असं जाहीररित्या सांगणार तर नाही ना. जर भाजपचे कोणी आमदार आमच्याकडे आले, तर त्यांना राजीनामा देऊन त्यांना यावं लागेल. ते आमच्याकडे आले तर ते निवडून येऊ शकतात. राजस्थानमध्ये ते (भाजप) चांगला धडा शिकलेले आहेत, असेही वक्तव्य छगन भुजबळांनी यावेळी केले.
सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरणी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नाही. वडाची साल पिंपळाला लावण्याचा हा प्रयत्न आहे. पद्म समितीवर घ्यायचं काही नाही, हा मुख्यमंत्र्यांचा भाग आहे. इतर काहीही म्हणतात. त्याला अर्थ नाही. एखादे नेते काही बोलतात त्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही, असे छगन भुजबळ यावेळी म्हणाले. (Chhagan Bhujbal on Sharad Pawar criticize Parth Pawar)
पार्थ पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते नाहीत, शरद पवारांचं कोणतंही विधान निरर्थक नसतं : संजय राऊतhttps://t.co/HVgtqsQCLa @rautsanjay61 @parthajitpawar #ParthPawar @NCPspeaks #NCP
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 13, 2020
संबंधित बातम्या :
पार्थ पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते नाहीत, शरद पवारांचं कोणतंही विधान निरर्थक नसतं : संजय राऊत