मोठी बातमी! शरद पवार यांनी बोलावलं तर…, छगन भुजबळ यांचं धक्कादायक विधान; भुवया उंचावल्या

| Updated on: Jul 05, 2023 | 12:09 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांचं आज मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन होत आहे. वांद्रे येथे अजित पवार यांच्या तर मंत्रालयासमोरील वाय. बी. चव्हाम सेंटरमध्ये शरद पवार यांच्या गटाची बैठक होत आहे.

मोठी बातमी! शरद पवार यांनी बोलावलं तर..., छगन भुजबळ यांचं धक्कादायक विधान; भुवया उंचावल्या
chhagan bhujbal
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आता दोन्ही गटाने वेगवेगळया बैठका बोलावल्या आहेत. दोन्ही गट आपआपलं शक्तीप्रदर्शन करणार आहेत. आजच्या बैठकीतून कुणाकडे किती आमदार आणि खासदार आहेत हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या बैठकांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काही आमदार शरद पवार यांच्या बैठकीकडे जाताना दिसत आहेत. तर काही आमदार अजित पवार यांच्या बैठकीकडे जाताना दिसत आहे. अजित पवार गटाची बैठक थोड्याच वेळात सुरू होणार आहे. त्यापूर्वीच राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अजित पवार गटाची वांद्रे येथील छगन भुजबळ नॉलेज सिटीमध्ये बैठक होत आहे. दुपारी 1 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारी झाली आहे. त्यापूर्वीच छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे. शरद पवार यांच्या बैठकीला राष्ट्रवादीचे आमदार गेले आहेत, असं छगन भुजबळ यांना सांगण्यात आलं. त्यावर भुजबळ हसले. दोन चार आमदार गेले असतील. साहेब बोलावतात म्हणून आमदार जातात. शरद पवारांना मला बोलावलं तर मीही जाईन, असं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे. भुजबळ यांनी मिश्किल भाष्य केलं आहे. मात्र, राज्यातील बदलती राजकीय समीकरणे आणि घडामोडी पाहता भुजबळ यांच्या या विधानाचेही अनेक अर्थ काढले जात आहेत.

हे सुद्धा वाचा

खुर्च्या कमी झाल्या

अजित पवार यांच्या गटाची वांद्रे येथील भुजबळ नॉलेज सिटीत बैठक होत आहे. त्यासाठीची तयारीही झाली आहे. एमआयटीत भव्य स्टेज उभा केला आहे. या स्टेजवर आधी 45 खुर्च्या लावण्यात आल्या होत्या. 45 आमदार बसतील अशा बेताने या खुर्च्या लावण्यात आल्याचं सांगितलं जातं. नंतर या खुर्च्या काढण्यात आल्या. स्टेजवर फक्त दहाच खुर्च्या ठेवल्या.

9 मंत्र्यांच्या आणि एक प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी अशा दहा खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. बाकी आमदार खाली बसतील अशी व्यवस्था केली आहे. स्टेजवर 45 खुर्च्या ठेवल्या आणि कमी आमदार आले तर अजित दादा यांचं बंड फसल्याचं उघड होईल. त्यामुळे स्टेजवरच्या खुर्च्या कमी केल्या गेल्याची जोरदार चर्चा आहे.

पवारांचं शक्तीप्रदर्शन

शरद पवारही यांनीही आज आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. मंत्रालयासमोरी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला किती आमदार आणि खासदार उपस्थित राहतात? शरद पवार बैठकीत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.