Rajyasabha Election | अपमानाचा बदला घेणाऱ्या आमदारांचे आभार, शिवसेना भवनासमोर संभाजीराजे समर्थकांची पोस्टरबाजी

| Updated on: Jun 12, 2022 | 11:45 AM

छत्रपती संभाजीराजे यांनी या बॅनरबाजीवर प्रतिक्रिया दिली आहे. कार्यकर्त्यांनी माझ्या प्रेमापोटी हे फ्लेक्स लावले आहेत. त्यांच्या प्रेमाचा मी आदर करतो. मात्र कोणत्याही पक्षाला खुन्नस म्हणून त्यांच्या कार्यालयासमोर अशी काही कृती करणे, हे माझ्या तत्त्वात बसत नाही, असे ते म्हणाले.

Rajyasabha Election | अपमानाचा बदला घेणाऱ्या आमदारांचे आभार, शिवसेना भवनासमोर संभाजीराजे समर्थकांची पोस्टरबाजी
शिवसेनाभवनासमोर संभाजीराजे समर्थकांकडून पोस्टरबाजी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः छत्रपती संभाजीराजे (Chatrapati Sambjajiraje) यांचा अपमान करणाऱ्या शिवसेनेचा बदला घेणाऱ्या सर्व आमदारांचे  (MLA)आभार अशा आशयाचे पोस्टर्स आज शिवसेना भवनासमोर लागलेले दिसत आहेत. कोल्हापूरचे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या समर्थकांनी ही बॅनरबाजी केली आहे. राज्यसभा निवडणुकीपूर्वी संभाजीराजेंचा अपमान करणाऱ्या शिवसेनेला (ShivSena) चांगलाच धडा मिळाल्याची भावना संभाजीराजे समर्थकांमध्ये आहे. राज्यसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या संभाजीराजेंनी शिवसेनेकडे जाहीर पाठिंबा मागितला होता. मात्र शिवसेनेने तो नाकारून कोल्हापुरातूनच संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. त्यामुळे संभाजीराजेंनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर नाराजी दर्शवत राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. संजय पवार यांचा मात्र भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्यासमोर पराभूत झाले.

शिवसेनाभवनासमोर बॅनरबाजी

शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा राज्यसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर संभाजीराजेंनी फार तीव्र प्रतिक्रिया दिली नाही, मात्र त्यांच्या समर्थकांनी शिवसेना भवनासमोर आज बॅनरबाजी केली. गनिमी कावा वापरून छत्रपतींच्या अपमानाचा बदला घेणाऱ्या सर्व आमदारांचे आभार असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. आधीच पराभवामुळे अस्वस्थ असलेल्या शिवसेनेला ही बॅनरबाजी अधिक जिव्हारी लागू शकते.

हे सुद्धा वाचा

बॅनरबाजीवर छत्रपतींची प्रतिक्रिया काय?

दरम्यान, छत्रपती संभाजीराजे यांनी या बॅनरबाजीवर प्रतिक्रिया दिली आहे. कार्यकर्त्यांनी माझ्या प्रेमापोटी हे फ्लेक्स लावले आहेत. त्यांच्या प्रेमाचा मी आदर करतो. मात्र कोणत्याही पक्षाला खुन्नस म्हणून त्यांच्या कार्यालयासमोर अशी काही कृती करणे, हे माझ्या तत्त्वात बसत नाही. मी राजकारणात येणार असलो तरी ‘स्वराज्य’ ला तत्त्वांची बैठक असेल, अशी प्रतिक्रिया देणारे ट्विट संभाजीराजेंनी केलं आहे.

‘स्वराज्य’च्या माध्यमातून राज्यात दौरे

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीपूर्वीच संभाजीराजे अपक्ष म्हणून लढणार का वेगळ्या पक्षाची स्थापना करणार या चर्चांना उधाण आले होते. शिवसेनेनेही त्यांना शिवबंधन बांधण्याची ऑफर दिली होती. मात्र संभाजीराजेंनी स्वराज्य संघटनेची स्थापना केली. सध्या तरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभर दौरे करणार असून मराठा संघटनांना एकत्रित करणार असल्याचं सूतोवाच संभाजीराजेंनी केलं. त्यानुसार त्यांनी दौरेही सुरु केले असल्याची माहिती दिली आहे.