आज के शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तक वाद : आतापर्यंत शांत असलेल्या उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Jan 13, 2020 | 6:16 PM

या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत थेट तुलना केल्याने महाराष्ट्रात संताप (Chhatrapati Udayanraje Bhonsles first reaction on AAj ke Shivaji Narendra Modi book) व्यक्त केला जात आहे.

आज के शिवाजी नरेंद्र मोदी पुस्तक वाद : आतापर्यंत शांत असलेल्या उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया
Follow us on

मुंबई : भाजप नेते जय भगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन देशभर वाद सुरु आहे. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत थेट तुलना केल्याने महाराष्ट्रात संताप (Chhatrapati Udayanraje Bhonsles first reaction on AAj ke Shivaji Narendra Modi book) व्यक्त केला जात आहे. या पुस्तकावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजांना भाजपचा राजीनामा देऊन भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान दिलं होतं. या आव्हानानंतर भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती आणि माजी खासदार उदयनराजे भोसले हे काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. (Chhatrapati Udayanraje Bhonsles first reaction on AAj ke Shivaji Narendra Modi book)

याप्रकरणी आतापर्यंत उदयनराजे भोसले यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अर्थात उदयनराजे भोसले यांनी आपण या पुस्तकाबाबत उद्या बोलू अशी प्रतिक्रिया आज सोशल मीडियावर जाहीर केली आहे.

उदयनराजे म्हणतात, “‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या वादग्रस्त पुस्तकावर उद्या मंगळवार दि १४ जानेवारी २०२० रोजी दुपारी १२.३० वाजता रेसिडन्सी क्लब, पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन सडेतोडपणे आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत तुलना करणारे ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी us पुस्तक काल (12 जानेवारी) प्रकाशित झाले. हे पुस्तक भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहले आहे. या पुस्तकावरुन राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. विरोधकांनी या पुस्तकावरुन भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील यावरुन माजी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांना हे मान्य आहे का? असा सवाल केला आहे.

चिडचीड करण्यापेक्षा राजीनामा देऊन भूमिका घ्या, संजय राऊतांचा संभाजीराजे, उदयनराजेंना सल्ला

महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे सातारा कोल्हापूरचे जे वंशज आहेत. ते सर्व भाजपमध्ये आहेत. त्यामुळे मग या दोन्ही गाद्या आहेत त्यांचा महाराष्ट्राला सन्मान आहे त्या प्रमुख लोकांनाही शिवाजी महाराजांची तुलना योग्य आहे की नाही याबद्दल भूमिका घ्या असे जर मी म्हटलं किंवा जनतेने सांगितलं तर चिडाचीड करण्याचे कारण नाही. तुमची नेमणूक भाजपने केली. कोणी भाजपचे आमदार आहेत. कोणी खासदार आहेत. कोणी माजी खासदार आहे. तुम्ही वंशज आहात. त्याबद्दल आम्हाला आदर प्रेम आहे. याचा अर्थ तुम्ही भूमिका घेऊ नये का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मान सन्मानाबद्दल आमच्यासारख्या सर्व सामान्यांनी लढायचं आम्ही लढू आम्ही शिवसैनिक आहोत. तुम्ही तर त्यांचे वंशज आहात. तुम्ही त्यांचे नातं सांगता. मग तुमची जबाबदारी सर्वात जास्त आहे. तुम्ही पटकन राजीनामे दिले पाहिजेत. देणार आहात का?,” असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांचा छत्रपतींच्या वंशजांना सवाल

संजय राऊत म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना या विश्वात कुणाशीच होऊ शकत नाही. एक सूर्य, एक चंद्र आणि एकच शिवाजी महाराज… ‘छत्रपती शिवाजी महाराज’. निदान महाराष्ट्र भाजपने तरी यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयनराजे, श्रीमंत शिवेंद्रराजे आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का? शिवरायांच्या वंशजांनो बोला. काहीतरी बोला.”

भाजप कार्यालयात ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ असं ‘महान’ पुस्तक लिहून प्रसिद्ध करणारे हे महाशय कोण आहेत? हेच ते जय भगवान गोयल ज्यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांच्या महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजपा!, असं म्हणत राऊत यांनी पुस्तकाचे लेखक गोयल यांच्यावर निशाणा साधला.

संजय राऊत म्हणाले, “जय भगवान गोयल आधी शिवसेनेत होते. त्यांनी महाराष्ट्र सदनावर हल्ला करताच त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. आता या महाशयांनी शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख करुन नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजांबरोबर केली. हे भाजपमध्ये शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का?”

या वादानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी देखील आक्षेप घेतला आहे. तसेच या पुस्तकावर बंदी घाला, अन्यथा याचे वाईट परिणाम होतील, असा इशारा दिला आहे. संभाजीराजे म्हणाले, “दिल्लीच्या भाजप कार्यालयात ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं. मात्र, त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना होणार नाही. त्या पुस्तकावर तात्काळ बंदी आणावी. नाहीतर हा वाद वाढून याचे वाईट परिणाम होतील.”