वाजपेयींच्या पुतणीने छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची धाकधूक वाढवली!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

Chhattisgarh assebmly election result : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान ही राज्य भाजपच्या हातून गेल्यात जमा आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे. छत्तीसगडमध्ये भाजपसाठी सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे मुख्यमंत्री रमण सिंह हे पिछाडीवर आहेत. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची पुतणी करुणा शुक्ला यांनी रमण सिंहांची धाकधूक वाढवली […]

वाजपेयींच्या पुतणीने छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची धाकधूक वाढवली!
Follow us on

Chhattisgarh assebmly election result : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान ही राज्य भाजपच्या हातून गेल्यात जमा आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल केली आहे. छत्तीसगडमध्ये भाजपसाठी सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे मुख्यमंत्री रमण सिंह हे पिछाडीवर आहेत.

दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची पुतणी करुणा शुक्ला यांनी रमण सिंहांची धाकधूक वाढवली आहे. सुरुवातीलाच रमण सिंह जवळपास दीड हजार मतांनी पिछाडीवर होते. काँग्रेसने सलग 15 वर्षांपासून मुख्यमंत्री असलेल्या रमण सिंहांना रोखण्यासाठी वाजपेयींच्या पुतणीलाच मैदानात उतरवलं आहे आणि काँग्रेसच्या या खेळीला यश येताना दिसतंय.

छत्तीसगडचं मुख्यमंत्रीपद सलग 15 वर्षे भूषवलेल्या उमेदवारावर पिछाडीची वेळ आल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्येही चिंतेचं वातावरण आहे. यामुळे सर्वांचीच धाकधूक वाढली आहे.

90 विधानसभा सदस्यसंख्या असलेल्या छत्तीसगडमध्ये बहुमतासाठी 46 जागांची आवश्यकता आहे. भाजपला 25 जागांवरही आघाडी घेता आलेली नाही. तर काँग्रेसने 58 जागांची आघाडी घेतली आहे. रमण सिंह हे भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवारही आहेत.

छत्तीसगडसोबतच राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांचीही मतमोजणी होत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड ही तीन राज्य भाजपच्या हातून गेल्यात जमा आहेत. काँग्रेसने राजस्थानमध्ये दमदार पुनरागमन केलं आहे.

LIVE :  पाच राज्यांचे निकाल, राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला बहुमत