मुंबई : शिवसेनेचे हिंगोलीतील बंडखोर आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) त्यांच्या आक्रमक शैलीमुळे नेहमीच चर्चेचत असतात. मात्र, त्यांच्या या आक्रमकवृत्तीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले आहेत. बांगर नेहमीच कायदा हातात घेणारी कृत्य करत असताता यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना संयमाने वागण्याचा सल्ला दिला आहे.
अलिकडेच आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीत पीकविमा कार्यालयाची तोडफोड केली होती. पीकविमा कंपनीची आमदार बांगर यांनी पाहणी केली. त्यावेळी कोणताही अधिकारी उपस्थित नसल्याचं दिसून आले. बराच वेळ बांगर शेतकऱ्यांसह कार्यालयात थांबले होते.
बांगर आणि शेतकऱ्यांनी अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे संतप्त शेतकरी आणि बांगर यांनी संतापाच्या भरात पीकविमा कार्यालयाची तोडफोड केली.
काही महिन्यांपूर्वी बांगर यांना एका उपहार गृहात निकृष्ट दर्जाचे अन्न सापडले होते. तेव्हा संतोष बांगर यांनी उपहारगृह व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली होती.
तर, नुकत यांनी माध्यान्ह भोजनाचा ग्रामीण भागातून जाणारा वाहनाचा ताफा अडवून मेन्यूची तपासणी केली. वरण, भात, भाजी सह सर्व पदार्थ त्यांनी चेक केले होते. तपासणी दरम्यान वरणात आळ्या आढळून आल्याचा आरोप आमदार संतोष बांगर यांनी केला होता.
बांगर यांच्या वर्तनुकीमुळे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री चांगलेच संतापले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण, कार्यालय फोडण्याच्या घटनेमुळे सरकारची बदनामी होतेय.
यामुळे बोलताना आणि वागताना सरकारची बदनामी होणार नाही असं कृत्य टाळा अशी समज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बांगर यांना दिली आहे.
आपण सरकार मध्ये आहोत याचे भान ठेवून काम करा. मतदार संघातील कामे प्रशासकिय नियमा नुसार करुन घ्या, विरोधकांना टिकेची संधी देऊ नका असा सल्लाही मुख्यमंत्र्यानी त्यांना दिल्याचे समजते.