शरद पवार यांच्या तुकड्यांवर कोण जगतोय?, रामदास कदम यांचा निशाणा कुणाकडे

| Updated on: Mar 19, 2023 | 11:49 AM

त्याला मी दोन कवडीची किंमत देत नाही. तो नाच्या आहे. त्याचा मेंदू सडलेला आहे. असा निच माणूस मी अख्या जगात कुठं पाहिला नाही.

शरद पवार यांच्या तुकड्यांवर कोण जगतोय?, रामदास कदम यांचा निशाणा कुणाकडे
रामदास कदम
Follow us on

रत्नागिरी : ज्याच्यात नाही दम ते रामदास कदम अशा शब्दात भास्कर जाधव यांनी टोला लगावला. बेडूक कितीही फुगला तरी बैल होऊ शकत नाही, असं भास्कर जाधव यांनी म्हंटलं. रामदास कदम यांच्या नाच्या म्हणत असलेल्या टीकेला भास्कर जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. चिपळूणच बांडगुळ हे भास्कर जाधव आहे. त्याला मी दोन कवडीची किंमत देत नाही. तो नाच्या आहे. त्याचा मेंदू सडलेला आहे. असा निच माणूस मी अख्या जगात कुठं पाहिला नाही. खाल्लेल्या घराचे वासे मोजणारी औलाद म्हणजे भास्कर जाधव, अशी जहरी टीका रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर केली.

ते काय माझा पराभव करणार

२०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत भास्कर जाधव याला राजकारणातून गाळणार, असंही रामदास कदम म्हणाले. यावर भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं. रामदास कदम यांना मी २००९ साली पराभूत केलं आहे. ते रामदास कदम ते माझा काय पराभव करणार, असा सवाल भास्कर जाधव यांनी विचारला.


तेव्हा कोकणाला काही दिलं नाही

यावर बोलताना रामदास कदम म्हणाले, शरद पवार यांच्या तुकड्यावर कोण जगतंय हे अख्ख्या देशाला माहिती आहे. असा टोलाही रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांनी लगावला. ज्याला कावीळ झाली आहे त्याला जग पिवळं दिसतं. अशी टीका रामदास कदम यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरे खेडमध्ये आले आणि म्हणाले की माझ्या हातात देण्यासारखे काही नाही. मात्र जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा खूप काही कोकणाला देता आलं असतं, याची आठवण रामदास कदम यांनी काढून दिली.

कोटेश्वरी मानाई देवीची केली पूजा

रामदास कदम म्हणाले, माझ्यावरील टीकेला खेड येथील सभेतून उत्तर मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात चांगलं काम करतायेत. असा मुख्यमंत्री मी कधीही पाहिला नाही. एवढं ते काम करतायेत. शिवसेना नेते रामदास कदम यांनी सभेच्या पूर्वी गावातील कोटेश्वरी मानाई देवीची पूजा केली. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्र्यांसह कदमांच्या गावातील मानाई देवीचं दर्शन घेणार आहेत, अशी माहिती रामदास कदम यांनी दिली.