संजय राठोड यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा होतो; आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाष्य

| Updated on: Oct 17, 2022 | 12:00 AM

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे संजय राठोड अडचणीत आले होते.

संजय राठोड यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा होतो; आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाष्य
Follow us on

ठाणे : एकदा शब्द दिल्यानंतर मागे फिरणं हा माझा स्वभाव नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे. हे पटवून देताना त्यांनी संदजय राठोड यांचे उदाहरण दिले. संजय राठोडांवर झालेल्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले आहे. संजय राठोडांवर आरोप झाले. मात्र, मी संजय राठोडांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा होतो. दिलेला शब्द मी पाळतो अस देखील एकनाथ शिंदे म्हणाले.

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राठोड हे वन मंत्री होते. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे संजय राठोड अडचणीत आले होते. त्यांना आपल्या मंत्री पदाचा देखील राजीनामा द्यावाल लागला होता.

मात्र, नंतर त्यांना या प्रकरणात क्लिनचिट मिळाली. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर संजय राठोड यांनी पुन्हा एकदा मंत्री झाले आहेत.