मुंबईः मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हा पहिलाच गणेशोत्सव (Ganesh Festival) आहे. या प्रमाणेच कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षे राज्यातील नागरिकांनाही घरात गणेशोत्सव साजरा करावा लागला. मात्र दोन वर्षानंतर कोरोनाची साथ नियंत्रणात आली असून यावर्षीचे सगळेच सण उत्साहात मोकळेपणाने साजरे करण्याचं आवाहान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. राज्यातील सत्ता संकटानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री (Devendra Fadanvis) यांनी यापूर्वीचा दहीहंडीचा उत्सवही जल्लोषात साजरा केला. आज गणेशोत्सवाच्या प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आजपासून महाराष्ट्राच्या विकासाचा श्रीगणेशा करुयात, असं आवाहन जनतेला केलं.
गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘ महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या गणरायाचं आगमान घराघरात होतंय. दोन वर्षापासून कायम असलेलं कोरोनाचं संकट दूर झालंय. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा करुया. गणपती देवता आपल्या सर्वांच्या आय़ुष्यात सुख समृद्धी आणि समाधान घेऊन येवो, अशी प्रार्थना मी करतो. महाराष्ट्राच्या विकासाचा पुनःश्च श्रीगणेशा करण्याचा आपण संकल्प करुयात. सर्व एकजुटीने प्रयत्न करुयात….
राज्यातील तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या मंगलमयी शुभेच्छा! pic.twitter.com/3HkYthhNJI
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 31, 2022
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘ सामाजिक भान जपणं आवश्यक आहे. सार्वजनिक गणेशमंडळांनी आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यासारख्या सामाजिक विषयांवर जनजागृती करावी,असं आवाहन मी गणेशभक्तांना करतो. आपल्या सर्वांच्या साक्षीनं महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासाचा दृढ संकल्प मी केलाय. तो पूर्णत्वास नेण्यासाठी आपली साथ हवी आहे. कोरोनामुळे मंदावलेली विकासाची गती पुन्हा गाठायची आहे. कितीही आव्हानं आली तरी तमा बाळगायची नाही. मोकळ्या वातावरणात मोकळा श्वास घेत, हा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करुयात, गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा….