Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची स्पेशल ‘टीम’, सात अधिकाऱ्यांमध्ये राज्यभरातून कोणा-कोणाची वर्णी ?

| Updated on: Jul 23, 2022 | 1:21 PM

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष पुन्हा गजबजणार आहे. या कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी म्हणून मंगेश चिवटे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. सोमवारी चिवटे कक्ष प्रमुखाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात हा कक्ष सुरू होता माञ अनेक जाचक अटींमुळे त्याचा लाभ मोठ्या संख्येने गरजूंना होऊ शकला नव्हता.

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची स्पेशल टीम, सात अधिकाऱ्यांमध्ये राज्यभरातून कोणा-कोणाची वर्णी ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us on

मुंबई : (Cabinet Expansion) मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्याने सध्या राज्याचा कारभार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेच हाकत आहेत. असे असले तरी आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून 7 विशेष अशा (Special Officer) अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून ते (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खाजगी अधिकारी राहणार आहेत. त्यामुळे कारभारात तत्परता तर येईलच पण कामाचा भारही अधिकाऱ्यांवर सोपवला जाणार आहे. यामध्ये यामध्ये बालाजी खातगावकर खासगी सचिव, नितीन दळवी, डॉ. राजेश कवळे, डॉ. राहुल गेठे यांची विशेष कार्य अधिकारी तर प्रभाकर काळे स्वीय सहायक, प्रदीप जेठवा कक्ष अधिकारी आणि मंगेश चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष पुन्हा गजबजणार

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष पुन्हा गजबजणार आहे. या कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी म्हणून मंगेश चिवटे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. सोमवारी चिवटे कक्ष प्रमुखाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात हा कक्ष सुरू होता माञ अनेक जाचक अटींमुळे त्याचा लाभ मोठ्या संख्येने गरजूंना होऊ शकला नव्हता. आता पुन्हा या माध्यमातून रुग्णांची सेवा केली जाणार आहे. मंगेश चिवटे हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत.

निवडलेले अधिकारी अन् जबाबदारी

1) मंगेश चिवटे – मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी म्हणून मंगेश चिवटे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

2) बालाजी खातगावकर– आत्तापर्यंत ठाणे उपायुक्त, भिवंडी उल्लानगर, मिरा भाईंदर येथे आयुक्त म्हणून काम केलं आहे. 2019 पासून एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत.

3) नितीन दळवी– यांनी सुरुवातीपासुन एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. ते एकनाथ शिंदे यांच्यासाठी विधान मंडळातील कामकाज पाहतात.

4) राजेश कवळे– नाशिक विभागात विविध पदांवर कार्यरत होते. 2014 पासुन एकनाथ शिंदे यांच्याकडे काम करत आहेत. सर्व आमदारांच्या अडचणी समजून घेणे आणि एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहचवणे हे त्याचं काम होतं

5) राहुल गेठे– उपायुक्त म्हणुन नवी मुंबई पालिकेत कार्यरत होतें. एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्यानंतर त्यांच्याकडे गडचिरोली आणि नागपूरची जबाबदारी देण्यात आली होती. कोरोना काळात एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्व आमदारासाठी मदतीच काम यांनी केलं. यामधे कोव्हिड सेंटर मजूर करणे आणि ती पोहचवणे याचं काम पाहिल

6) प्रभाकर काळे– हे सुरुवातीपासुन एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव म्हणुन काम करतात. तर प्रदीप जेठवा कक्ष अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.