मुंबई : “पूजा चव्हाण ही मुलगी महाराष्ट्राची लेक आहे. तिला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. शिवसेना नेते संजय राठोड यांनी स्वत: खाल्लेल्या शेणासाठी समजाला वेठीला धरु नका,” अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या चित्रा यांनी दिली. (Chitra wagh comment on Forest Minister Sanjay Rathod resignation)
चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या?
संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे, याची सरकारकडून अद्याप घोषणा झालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबत काहीही भूमिका घेतलेली नाही. आम्ही काल जे आवाहन केलं होतं. त्याचा ते नक्की विचार करतील. येत्या काही क्षणांत ते हा राजीनामा नक्की मंजूर करतील. हे आमचं पहिलं पाऊल उचललं आहे. ज्यावेळी राजीनामा मंजूर होईल, त्यावेळी ते पहिलं पाऊल ठरेल, असे चित्रा वाघ यांनी सांगितले.
यात फक्त प्रश्न पूजा चव्हाण आणि संजय राठोडाचा अजिबात नाही. कारण महाराष्ट्राने कायम दिशा देण्याचे काम केले आहे. त्या महाराष्ट्रात बलात्कारांना, हत्यारांना बसण्याचा अधिकार नाही. जे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले अजून एफआयआर झालेला नाही. आज १८ दिवस झाले, अनेक प्रश्न विचारत आहोत, तरी काही कारवाई होणार नसेल, त्यावर कोणी काही बोलणार नसेल, तर निश्चितपणे या केसमध्ये ज्या पोलिसांची यात संदिग्ध भूमिका आहे, त्या पोलिसांना त्या ठिकाणी बसण्याचा अधिकार नाही.
अकार्यक्षम पोलिसांना त्या ठिकाणी बसण्याचा अधिकार नाही. गुन्हेगाराला जात नसते. आधी शेण खायचं आणि नंतर समाजाला वेठीला धरायचं जो कार्यक्रम संजय राठोडने केला आहे. निसर्ग पूजक असणाऱ्या बंजारा समाजाचा आम्हाला नितांत आदर आहे. समाजाचे आम्हाला कौतुक आहे. समाजाला ढाल करुन स्वत: केलेल्या शेणासाठी तुम्ही समजाला वेठीला धरु शकत नाही.
निष्पक्ष चौकशी व्हावी तर 15 दिवस कुठे गायब झाला होता. विरोधक आरोप करत आहे, तर त्याचं उत्तर द्यायला पुढे का आला नाहीत. कुटुंबाला सांभाळत होता की समजावत होता. अशी कोणती वेळ होती की तुम्ही १५ दिवस का गायब होता. एका मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर संजय राठोड पुढे का आले नाही. २२ वर्षाचं लेकरु आहे. ही मुलगी महाराष्ट्राची लेक आहे. तिला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
मुख्यमंत्री आणि शिंदे यांच्यात स्वतंत्र दालनात चर्चा झाल्यानंतर पुन्हा राठोड यांच्यासोबत काही मिनिटे चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राठोड यांना राजीनामा देण्यास सांगितलं. त्यानंतर राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आणि तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला. वर्षा बंगल्यावर जवळपास 1 तास चाललेल्या या बैठकीनंतर अखेर राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. (Chitra wagh comment on Forest Minister Sanjay Rathod resignation)
वरिष्ठांचा आशीर्वाद असल्यानेच राठोडांवर कारवाई नाही, चौकशी अधिकाऱ्याला निलंबित करा: देवेंद्र फडणवीस
‘राजीनामा तुमच्याकडेच ठेवा, राज्यपालांकडे पाठवू नका’, राठोडांचं अजुनही मुख्यमंत्र्यांवर दबावतंत्र
…म्हणून मी मंत्रिपद सोडलं, संजय राठोड यांची राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया