मुंबई : काय नाना… तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटीलीतं, असा सवाल भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केला आहे. ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एका महिलेसोबत आहेत. हाच व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी आता ट्रोलिंगला सुरुवात केली आहे. दुसरीकडे खासगी व्हिडिओ शेअर केल्याने चित्रा वाघ यांच्यावरही टीका होत आहे. दरम्यान, हा व्हिडिओ मॉर्फ केलेला असून यामागे भाजपाचे (BJP) कटकारस्थान असल्याचे नाना पटोले यांचे म्हणणे आहे. तर नाना पटोलेंचा व्हिडिओ माझ्याकडे आल्यानंतर मला धक्का बसला, असे चित्रा वाघ म्हणाल्या.
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना नेटकऱ्यांनी आज ट्रोल केले आहे. मेघालय राज्याच्या चेरापुंजी येथील एका हॉटेलमध्ये महिलेसोबत गळ्यात हात टाकून खुर्चीवर बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. नानांच्या विरोधात टीकेची झोड उठलेली आहे. मात्र या दरम्यान, नाना पटोले यांना विचारपूस केली असता त्यांनी हे भाजपाचे कट कारस्थान असल्याचा आरोप नाना पाटोले यांनी केला आहे. त्याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे नाना पटोले यांनी केला आहे. यावर कायदेशीर बाबी आमची लीगल टीम तपासत आहे, असे नाना पटोले म्हणाले.
काय नाना…..तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलीतं….??@NANA_PATOLE @INCIndia @MumbaiPMC @INCMumbai pic.twitter.com/7GnKQ2t6jW
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 20, 2022
नाना पटोले सध्या पूरग्रस्त भागांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहेत. अशातच त्यांचा महाराष्ट्राच्या बाहेरील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काम करणाऱ्याला बदनाम करणे, ही भाजपाची रणनीती आहे. त्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले. चित्रा वाघ यांच्याविषयी मी काहीही बोलणार नाही, असेही नाना पटोले म्हणाले. दरम्यान, नाना पटोलेंना याची उत्तरे द्यावी लागतील, असे पत्रकार परिषदेच चित्रा वाघ यांनी मागणी केली आहे.
टीप – व्हायरल व्हिडिओच्या सत्यतेबाबत टीव्ही 9 खात्री देत नाही.