सांगली : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्याबद्दल पुन्हा एकदा खुलासा केला आहे. मंत्री संजय राठोड प्रकरणी माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. माझा लढा अद्यापही सुरू आहे. माझी जेवढी इच्छाशक्ती आहे तेवढे मी लढत आहे. ज्यावेळी त्या मुलीवर अन्याय झाला तेंव्हा आता प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी आवाज का उठवला नाही ? असा सवाल देखील उपस्थित केला आहे. संजय राठोड यांना क्लीनचिट ही तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली असा दावाही चित्रा वाघ यांनी केला आहे. याच दरम्यान चित्रा वाघ यांनी लव्ह जिहादच्या मुद्द्यावर भाष्य करत अनेक सवाल उपस्थित केले आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या, १८ वर्षानंतर मुलींना कोणता धर्म स्वीकारायचा, कोणाशी लग्न करायचं हा संविधानाने अधिकार दिला आहे.
मात्र लव्ह जिहाद म्हणजे जबरदस्तीने मुलींना प्रेमाचे आमिष दाखवून पळवून नेऊन धर्मांतर करण्यास भाग पाडणे, जबरदस्तीने मुली पळवून नेऊन त्यांच्यावर अत्याचार केले जातात,
त्यामुळे लव्ह जिहाद कायद्याची गरज असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हंटले आहे, आता मुली 12 या वयोगटात वयात येत आहेत.
14 वर्षांच्या मुली सुद्धा गर्भवती होत आहेत. 18 वर्षांच्या खालील मुलींसाठी लव्ह जिहाद हा कायदा गरजेचा आहे असंही चित्रा वाघ यांनी म्हंटलं आहे.
लव्ह जिहाद बद्दल बोलत असतांना संजय राठोड यांच्यावर केलेल्या आरोपावर चित्रा वाघ अजूनही ठाम आहे, मंत्री संजय राठोड प्रकरणी माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे असं वाघ यांनी म्हंटलं आहे.
माझा लढा अद्यापही सुरू आहे. माझी जेवढी इच्छाशक्ती आहे तेवढे मी लढत आहे. ज्यावेळी त्या मुलीवर अन्याय झाला तेंव्हा आता प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी आवाज का उठवला नाही ? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.