मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रामुळे स्पर्धेचं राजकारण सुरु झालं आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या विनंतीनंतर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले, असे चित्र निर्माण होऊ नये आणि श्रेय अमित ठाकरेंना जाऊ नये यासाठी पत्रावर जुनी तारीख टाकली का? असे विचारले जात आहे. (CM allegedly wrote letter to PM on Medical Exams Postponement prior to Amit Thackeray Demand)
एमडी आणि एमएस डॉक्टरांच्या परीक्षा यंदा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विनंतीवजा मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटने हे पत्र काल (24 जून) रात्री उशिरा ट्वीट केलं. पण पत्रावर तारीख पाहिली, तर ती 18 जून अशी दिसते. त्यामुळे 18 जून रोजी पंतप्रधानांना लिहिलेलं पत्र सहा दिवसांनी ट्वीट का करण्यात आलं? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
CM Uddhav Balasaheb Thackeray has written to the Hon’ble PM @narendramodi ji requesting intervention to direct the Medical Council of India to postpone the MD/MS examination till December 2020 as the final year resident doctors are playing a crucial role in fighting this pandemic pic.twitter.com/fur87m2T1Y
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 24, 2020
मनसे नेते अमित ठाकरे यांची अलिकडेच निवासी डॉक्टर्सनी भेट घेतली होती. कोविड प्रादुर्भावात खूप काम करत असल्याने अभ्यास करण्यास पुरेसा वेळ मिळालेला नाही, त्यामुळे परीक्षांमध्ये सूट मिळावी, हा मुद्दा त्यांनी अमित ठाकरे यांच्याकडे मांडला होता. अमित ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट (22 जून) घेत या प्रकरणात परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.
या प्रकरणात आता श्रेयावरुन स्पर्धा सुरु झाली आहे का? असा प्रश्न उद्भवत आहे. कारण निवासी डॉक्टर्सच्या परीक्षांचा मुद्दा मोठा आहे. परीक्षा पुढे ढकलल्या गेल्यास त्याचे श्रेय मनसेला, पर्यायाने अमित ठाकरे यांना मिळू शकते.
अमित ठाकरे यांचे पत्र काय?
“संपूर्ण देशात कोविड रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. या वैद्यकीय लढाईत सुमारे 2500 निवासी डॉक्टर्स दिवसरात्र रुग्णसेवा बजावत आहेत. वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण (डिग्री आणि डिप्लोमा अंतिम वर्ष) घेणारे विद्यार्थी – निवासी डॉक्टर्स गेले अडीच-तीन महिने प्रचंड तणावाखाली आहेत. सुस्पष्ट धोरणाअभावी परीक्षेची टांगती तलवार त्यांना छळत आहे. ही परीक्षा आता 15 जुलैपासून घेण्यात येणार आहे. हा निर्णय घेताना 24 तास रुग्णांसाठी उपलब्ध राहणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या शारीरिक तसेच मानसिक क्षमतांचा विचारही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने केलेला नाही” असं अमित ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.
संबंधित बातमी : अमित ठाकरे राजभवनात, निवासी डॉक्टरांच्या परीक्षांबाबत राज्यपालांशी चर्चा
अमित ठाकरे यांनी कोविड वातावरणात डॉक्टर्स, परिचारिका, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी तसंच आशा स्वयंसेविका यांच्या मागण्यांचे मुद्दे घेऊन राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. लॉकडाऊनच्या काळात पुण्यात अडकलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्याना त्यांच्या घरी पोचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी फोनवर संवाद साधत सरकारकडून वाहन व्यवस्था उपलब्ध करुन देणे, बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात राज्य सरकारकडून वाढ करुन देणे आणि आशा स्वयंसेविकांबाबत उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांच्या मानधनात वाढ करुन देणे असे मुद्दे अमित ठाकरे यांनी हाताळले.
अमित ठाकरे यांचे युवा नेतृत्व पुढे लागले आहे. यातूनच स्पर्धेचं राजकारण सुरु होऊन मनसेकडे जाऊ शकणारे श्रेय थांबवण्यासाठी तारीख बदलली की खरेच जुने पत्र उशिराने ट्वीट झाले, हा संशोधनाचा मुद्दा आहे.
संबंधित बातम्या :
अमित ठाकरेंना दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी बारा तासात पाळला
(CM allegedly wrote letter to PM on Medical Exams Postponement prior to Amit Thackeray Demand)