महाराष्ट्र जिंकायला जातोय, आशीर्वाद द्या, स्वत:च्या मतदारसंघात केवळ 2 सभा घेऊन मुख्यमंत्री रवाना

| Updated on: Oct 17, 2019 | 12:03 PM

मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis Nagpur rally) त्यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर या मतदारसंघात केवळ दोनच सभा घेतल्या.

महाराष्ट्र जिंकायला जातोय, आशीर्वाद द्या, स्वत:च्या मतदारसंघात केवळ 2 सभा घेऊन मुख्यमंत्री रवाना
Follow us on

नागपूर : मी उभ्या महाराष्ट्रात जातो आणि असं रणकंदन निर्माण करतो,की भाजप मोठ्या प्रमाणात विजयी होईल आणि विरोधकांचा सूपडासाफ होईल. फक्त तुमचा आशीर्वाद द्या, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis Nagpur rally) यांनी त्यांच्या मतदारसंघातील मतदारांचा निरोप घेतला. मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis Nagpur rally) त्यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर या मतदारसंघात केवळ दोनच सभा घेतल्या.

मुख्यमंत्री सध्या राज्यभर प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना स्वत:च्या मतदारसंघात पुरेसा वेळ देता येत नाही. काल त्यांची दुसरी सभा झाली.

माझ्या मतदारसंघात प्रत्येक व्यक्तीच देवेंद्र फडणवीस आहे, मग मला माझ्या मतदारसंघात येण्याची गरज आहे का? असा सवाल त्यांनी मतदाराना विचारला. इथली निवडणूक तुम्ही सर्व सांभाळत आहेत. त्यामुळे मी आता प्रचाराला येणार नाही, तुम्हीच माझी निवडणूक लढवा असे मुख्यमंत्री म्हणाले.

या सभेत एका बाजूला त्यांनी नागपुरात गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश कसा मजबूत आणि सुरक्षित होत आहे, हे ही सांगितले.