मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता विरोधकांच्या कामावर नव्या सरकारकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) दणका दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हा नियोजन समितीच्या 600 कोटींच्या कामांना ब्रेक लावला आहे. घाई घाईत कामांना मंजुरी कशासाठी?, असा सवाल एकनाथ शिंदेंनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारला आहे. जिल्हा नियोजन कार्यसमितीची घाईघाईने बैठक घेऊन 567 कोटींचे काम मंजूर केले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांना दणका दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हा नियोजन समितीच्या 600 कोटींच्या कामांना ब्रेक लावला आहे. घाई घाईत कामांना मंजुरी कशासाठी?, असा सवाल एकनाथ शिंदेंनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारला आहे. जिल्हा नियोजन कार्यसमितीची घाईघाईने बैठक घेऊन 567 कोटींचे काम मंजूर केले होते.
एकीकडे राज्यात नवं सरकार सरकार स्थापन झालं आहे. अद्याप मंत्रीविस्तार होणं बाकी आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक होऊ घातली आहे. शिवसेनेकडून राजन साळवी यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. मविआकडून आणखी अर्ज दाखल केले जाण्याची शक्यता आहे. अश्यात आता विरोधी पक्षनेता कोण असेल, अशी चर्चा सुरु झाली आहे. यासाठी छगन भुजबळ विरोधी पक्षनेते पदी विराजमान होण्याची शक्यता आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचीही चर्चा आहे.