मुंबई – मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोंडीना प्रचंड वेग आला आहे. मुख्यमंत्री (EKNATH SHINDE) उपमुख्यमंत्री (Devendra Fadnavis) कायम दिल्लीत जाऊन भाजपच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातले विरोधक हे असंविधानिक सरकार असल्याचे म्हणत आहेत. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्याचबरोबर शिवसेने दाखल केलेल्या सोळा आमदाराच्या याचिकेवर सोमवारी कोर्टात सुनावणी होणार आहे, त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हर घर तिरंगा या भाजपच्या अभियानासंदर्भात उद्या दिल्लीत भाजपची बैठक आहे
तर रविवारी ओबीसी महासंघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार
दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यात भाजप पक्ष श्रेष्ठींसोबत देखील देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होण्याची शक्यता
देवेंद्र फडणवीस कालच दिल्ली दौऱ्यावरून आले होते, उद्या आणि परवा नियोजित कार्यक्रम असल्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीत जाणार
मी दोन दिवसांनंतर पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार, मी जे बोललो ते खरं आहे
जर यातला शब्द खोटा निघाला तर सार्वजनिक क्षेत्रातून संन्यास घेईल
शिंदे साहेबांना नक्षलवाद्यांची थ्रेट आहे, तरी ते लोकांबरोबर जातात, लोकांना भेटतात त्यामुळे आमचं टेन्शन वाढतं, असं मला एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं
आमदारांची बैठक बोलावण्यात आलेली नाही
कोर्टाची सुनावणी सुरु आहे, अंतरिम ऑर्डर सोमवार, मंगळवारपर्यंत येईल
त्यानंतर सुनावणी सुरुच राहील, त्यामुळे ऑर्डरचा मान ठेवण्यासाठी थांबलोय
त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल
कोर्टाचा मान ठेवावा असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनाही वाटतं
राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका धनश्री भांडारकर करणार शिंदे गटात प्रवेश
पश्चिम उपनगरातल्या माजी नगरसेविका हजारो कार्यकर्त्यांसह करणार प्रवेश
दिपक केसरकर
– पंतप्रधानांचं ठाकरे बद्दलच्या प्रेमाचा साक्षीदार आहे
– उद्धवजी आपल्या पदाचा त्याग करणार होते
– कार्यकर्त्यांसमोर ह्या गोष्टी ठेवण्यासाठी वेळ हवा होता
– ह्या गोष्टी फक्त आमच्या ३ लोकांना माहिती होतं
– ह्यात खूप वेळ गेला मात्र त्यात १२ आमदारांचं निलंबन झालं
– भाजपनं सांगितलं आपली बोलणी सुरु असताना हा निर्णय योग्य नाही
-* त्यानंतर नारायण राणेंचा मंत्रिमंडळात समावेश झाला हे उद्धवजींना आवडले नाही *
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचे शुक्रवार दि. ०५ ऑगस्ट २०२२ चे कार्यक्रम
सायंकाळी ४.४५ वाजता – गांधी मार्केटला भेट देणार (सायन)
सायंकाळी ५.१५ वाजता – हिंदमाता येथे भेट देणार (दादर पूर्व)
सायंकाळी ५.५० वाजता आणि ६.५० वाजता – कोस्टल रोडची पाहणी करणार, वरळी सी फेस, हाजीआली (वरळी)
सायंकाळी ०७.०० वाजता – इन्फिनिटी स्कल्पचर सुशोभीकरणाचं उद्घाटन आर जे थडानी आणि सर पोचखानवाला जंक्शन, वरळी
सायंकाळी ७.१५ – नरेश पाटील चौक सुशोभीकरणाचं उद्घाटन (वरळी)
– उद्धव ठाकरे आणि सेनेबाबतीत सध्या सहानुभूती आहे, शिवाय सेनेतून बाहेर पडलेल्या लोकांनी वेगळा गट स्थापन केला त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये सहानुभूती आहे,
– मराठी माणसांची अस्मिता म्हणजे शिवसेना आहे, त्यामुळे मी सेनेत प्रवेश केला आहे,
– मान सम्मान राहीन अशी जबाबदारी तुमच्याकडे देणार, असं आश्वासन देण्यात
– आदित्य ठाकरेंना मिळणारा प्रतिसाद सेना एक नंबरचा होईल,
– शिवसेनेत लवकरच आणखी काही लोकांचा प्रवेश होणार,
– उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला होणं म्हणजे महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांचा रोष आहे, त्यांच्या गाडीवर हल्ला म्हणजे पोलीस प्रशासनाचं अपयश आहे.
ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी ला गरज पडते तेव्हा सेक्युलर होतो
मात्र जेव्हा राजकारण करायचं असतं तेव्हा आम्ही भाजपची बी टीम होतो
मात्र शरद पवारांनी बैठकीला बोलावलं म्हणून आम्ही गेलो
आम्ही बसून एकत्र निर्णय घेतला…
मुसलमानांचा मोठा व्होट बँक आहे तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी पासून दुर गेला आहे
भाजपा शिवसेनेचा उपयोग करत आहे
एकदा का मुंबईवर कब्जा झाला की ते कोणाला कुठे सोडून देतील माहिती नाही
भाजपला शिवसेनेत दोन गट पाडायचे होते
मुंबई महापालिका भाजपला घ्यायची आहे त्यासाठी त्यांनी शिवसेनेत भांडणं लावली
आणि त्यात भाजपा यश मिळालं आहे
राज्यात दोनचं मंत्री कारभार करणार असतील तर आपल्याला सरकार कशाला पाहिजे
मंत्रीमंडळ कशाला पाहिजे त्यांना जर वाटत असेल तर असंच ठेवा तर ठेवा .
अब्दुल सत्तार फूकटाचे भपके आहेत
आम्ही त्यांना किंमत देत नाही काडीचीही किंमत देत नाही
आम्ही गीनतीत घेत नाही
एम आय एमवर बोललं की त्यांचा टीआरपी वाढतो
मुख्यमंत्री दौऱ्यावेळी सत्तारांनी केली होती जलीलांवर टिका
संभाजीनगर नामांतर करण्यास आजही माझा विरोध आहे
संभाजी राजाबद्दव माझ्या मनात आदर आहे
ज्या शहरात आठ आठ दिवस पाणी मिळत नाही
शहराचं नावं राजकीय फायद्यासाठी करायचं
मुसलमान औरंगजेबाला फॉलो करत नाही
इतिहासाचा तो एक भाग आहे
तुम्ही इतिहासाचं पान फाडू शकता पण इतिहास बदलू शकत नाही
तुमच्या आणि माझ्या पैशातून नरेंद्र मोदी पब्लिसिटी करतायेत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं 52 वर्ष हातात धरलं नाही
आम्ही झेंडा डीपीवर लावत नाही तिरंगा आमच्या रक्तात आहे
लसीकरणावर मोदींचा फोटो
घरावर झेंडा नाही लावला तर तुम्ही देशद्रोही
माझ्या घरावर बघायला येतील त्यांनी झेंडा लावला की नाही…
2014 पासून 15 ऑगस्टला मी तिरंगा यात्रा काढतो त्याची प्रेरणा नरेंद्र. मोदींनी घेतली
मुसलमान ही टोपी घालून तिरंगा गाडीवर लावून फिरतो
आम्ही कोणाकडे जाणार नाही
आमची ताकद आम्हाला माहिती आहे
त्यांना वाटत असेल की आमची ताकद आहे तर त्यांनी एक पाऊल टाकलं पाहिजे
– कितीही तोडा, जोडा आम्ही लढायला तयार असून आगामी महापौर मनसेचा होईल,
– प्रभाग रचनेच्या निर्णयावरून वसंत मोरेंची राज्य सरकारवर टीका,
– राजकारणाची चीड यायला लागली आहे,हिंमत असेल तर निवडणुकांना सामोरे जा,
– प्रत्येकजण सोईने प्रभाग रचना बदलतो आहे, मोरेंचा राज्य सरकारवर आरोप,
– मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात हिंमत असेल तर महापौरांची निवडही जनतेतून करावी,वसंत मोरेंनी दिले आव्हान
कवठेमहाकाळ नगरपरिषद जिंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित आर आर पाटील यांनी भाजपचे खासदार संजय काका पाटील याना पुन्हा एकदा धक्का देत किदरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवली आहे.
प्रवीण दरेकर ऑन काँग्रेस आंदोलन
काँग्रेसची संपूर्ण देशभर नौटंकी सुरू आहे
ईडी काय आज स्थापन झाली नाही
हा काही जनतेचा प्रश्न नाही
महागाई बेरोजगारी यावर आंदोलन करा
फक्त एका कुटूंबाला खुश करण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहेत
कॉग्रेस कार्यालयाबाहेर 100 पोलीस होते पण एक कार्यकर्ता नव्हता
परिवाराला वाचवण्यासाठी आंदोलन सुरू आहे
राज्याला वेळ देणारा राज्यपाल मी 25 वर्ष पाहिला नाही
राज्यपाल रोज 50 लोकांना भेटतात
फक्त नौटंकीसाठी काहींना भेट हवी होती
ईडी सूडबुद्धीने कारवाई करत नाही
जाणीवपूर्वक ईडीची कारवाई होत नाही
आंदोलन या देशात करायचा अधिकार आहे पण नौटंकी करायची हा हेतू असेल
यांना महागाईचे काही पडले नाही यांना राजकीय बेरोजगारी आलेली आहे
महागाई बेरोजगारीसाठी पंतप्रधान सक्षम आहे
ऑन संजय राऊत पत्नी
ज्यांना चौकशीसाठी बोलावण्याची आवश्यकता असते त्यांना बोलावलं जाते
ऑन मुंबई बँक
मुंबई बँकेत पक्षीय राजकारण त्यावेळी आले होते
आम्ही कुठल्याही पक्षात असलो तरी सहकाराचे कार्यकर्ते आहोत
सर्वानी एकतपणे काम करण्याचा निर्णय घेतला
मुंबईतल्या सहकाराचे नेतृत्व आम्ही करत आहोत
इथे पक्ष नसतो बँकेचे हित आम्ही जपत असतो
ऑन मंत्रीमंडल विस्तार
फडणवीस किंवा शिंदे हे घाबरणारे नेतृत्व नाही
लवकरच विस्तार होईल निर्णय फडणवीस आणि शिंदे घेतील
ऑन पुणे महानगर पालिका
वसंत मोरे आणि मनसेच्या ताकदीवर मी बोलणार नाही
वसंत मोरे यांना माझ्या शुभेच्छा आहेत
शिवसेना आमदार दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद
दिनांक – 5 ऑगस्ट 2022 (आज)
वेळ – दुपारी 2 वाजता
ठिकाण – सम्राट हॉटेल, चर्चगेट
या पत्रकार परिषदेसाठी आपला प्रतिनिधी अवश्य पाठवावा ही विनंती..
जीएसटी सह अन्य विषयावर आज काँग्रेसचा देशभर आंदोलन
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांची निदर्शन
केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
विमानतळाच्या संदर्भात जो निधी आम्ही दिला आहे
त्याबाबत जमीन अधिकरण करून ताब्यात घेण्यासाठी आज बैठक घेतली
राज्यातील सत्तांतराचा जिल्ह्यातील सहकारावर कोणताही परिणाम होणार नाही
एका प्रवृत्तीच्या विरोधात नागरिक गेले आहेत, त्यामुळे गोकुळमध्ये सत्तांतर झाले आहे
सत्ता बदल झाल्यामुळे त्यांना कदाचित असं वाटत असेल पण आम्ही सत्ता असो किंवा नसो आम्ही कायम जनतेत असतो
2011 पासून जनगगना झाली नाही त्यामुळे काही लॉजिक लावून हे मतदार संघ वाढवले होते
पण काहीतरी करायचे, निवडणुका पुढे ढकलायचा हा हेतू सरकारचा आहे
हे जनतेच्या मनातील सरकार नाही हे त्यांना ही माहीत आहे
8 तारखेपर्यंत मंत्रिमंडळ झाले नाही तर मोर्चा काढायला लागणार आहे
राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळासाठी दिलेला निधी रोखणे योग्य नाही
याबाबत दोन्ही काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटले आहेत
लोकशाही संपवायचं धोरण भाजपचे आहे त्यामुळे आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही
महागाई व जीवनावश्यक वस्तूंवरील वाढविलेल्या जीएसटीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आज केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले, यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली.
कॉंग्रेस आज देशभर आंदोलन सुरु केलं आहे. महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अनेक गाड्यांची तपासणी करण्यात येत आहे.
संजय राऊत मेडिकल टेस्टसाठी जे जे रुग्णालयाकडे रवाना
संजय राऊत मेडिकलसाठी रवाना, सोबत ईडीची टीम
दर ४८ तासांनी त्यांची चौकशी करण्यात येती
उद्या वर्षा राऊत यांची चौकशी करण्यात येणार आहे
समन्स दिल्याची माहिती मिळाली आहे.
महागाई विरोधात काँग्रेसचे आंदोलन
संसदे जवळ प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांना ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता
संसद परिसरामध्ये आंदोलन करायला परवानगी नाही
संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत काँग्रेस खासदारांचा लॉंग मार्च
संजय निरुपम यांच्यासह सुमारे 15 ते 20 काँग्रेस कार्यकर्त्यांना मुंबईच्या वर्सोवा पोलिसांनी ताब्यात घेतले. सगळे विरोध करणार होते,