मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं उद्या लोकार्पण होणार आहे. त्याआधी समृद्धी महामार्गामुळे (Samruddhi Mahamarg) काय फायदा होणार आहे? या महामार्गाचा वाहतुकीसाठी कसा फायदा होणार आहे? टोल किती द्यावा लागणार?, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष मुलाखत (Cm Eknath Shinde Exclusive Interview) tv9 मराठीवर…
ज्या देशातील रस्ते चांगले असतात त्या देशाची प्रगती अधिक वेगाने होते. अमेरिकेचंही तसंच आहे. त्यामुळे समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख उंचावेल, असा विश्वास आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मुलाखतीत बोलताना सांगितलं.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडण्यात आली. तेव्हा मी मंत्री होतो. तेव्हा या महामार्गाचं काम सुरू झालं. आता मी मुख्यमंत्री असताना त्याचं लोकर्पण होतंय. लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होतंय आणि या महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलंय, याचा मला आनंद आहे, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.
समृद्धी महामार्ग सत्यात आणण्याचा मार्ग खडतर होता. पण त्याचं काम उत्तम झालंय. याचा मला आनंद आहे, असंही शिंदे म्हणालेत.
जमीनी द्यायला शेतकऱ्यांचा विरोध होता. त्यांना जमीनी द्यायला तयार करावं लागत होतं. काही ठिकाणी मुद्दाम विरोध करायला भाग पाडलं जात होतं. तेव्हा मी स्वत: बुलढाण्याला गेलो होतो. त्यांचा समज मी दूर केला. त्यांना फायदा दाखवून दिला. त्यांच्या जमीनीचा योग्य मोबदला देण्याचं वचन दिलं. लोकांना विश्वास नव्हता की त्यांना योग्य दाम मिळेल की नाही याचा पण मी त्यांना खात्री दिली. कागदावर सही करून दिली. तेव्हा हे लोक आपली जमीन द्यायला तयार झाले, अशी आठवण शिंदेंनी सांगितली.
बुलढाण्याच्या लोकांचं मन परिवर्तन केल्यानंतर आम्ही तिथून निघालो. पायलटकडून विमान ढगात गेलं. तेव्हाचा तो प्रवास अतिशय अडचणीचा होता. तो थरारक प्रवास अजही आठवतो, असं शिंदेंनी सांगितलं.