मुंबई : गेल्या एक महिन्यापूर्वी राज्यात ठाकरे सरकार (Uddhav Thackerya) पडून शिंदे-फडणवीस (Cm Eknath Shinde) सरकार आलं यावेळी बरेच राजकीय नाट्य घडलं. मात्र हे राजकीय नाट्य राजकारणाापुरते मर्यादित राहिलं नाही. तर हा वाद थेट सुप्रीम कोर्टापर्यंत (Supreme Court) पोहोचला. एकनाथ शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवा. हे सरकार बेकायदेशीररित्या अस्तित्वात आलं आहे. तसेच शिवसेनाही ठाकरेंची आहे आणि धनुष्यबाण हा आमचाच आहे, असे म्हणत ठाकरे गट सुप्रीम कोर्टात पोहोचला. ठाकरे गटाकडून शिंदे विरोधात तब्बल चार याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिके वरती गेल्या काही दिवसांपूर्वी सुनावणी पार पडली. त्यावेळेस दोन्ही बाजूने घमसान युक्तीवाद झाला. कोर्टाने दोन्ही पक्षांना पुढची तारीख एक ऑगस्ट अशी दिली होती. मात्र या तारखेत बदल होऊन ही सुनावणी तीन ऑगस्टवरती गेली. आता उद्या शिंदे सरकारचा फैसला सुप्रीम कोर्टात होणार आहे.
गेल्यावेळी झालेल्या युक्तीवादामध्ये शिंदे गटाकडून त्यांची बाजू मांडताना एखाद्या मोठ्या गटाला त्यांचा नेता बदलाव वाटला तर त्यात गैर काय? असा युक्तिवाद करण्यात आला. मात्र कुठेतरी गुवाहाटीत बसून सांगणे शिवसेना आमचीच हे किती योग्य आहे? असे सवाल ठाकरेंच्या वकिलांकडून विचारण्यात आले. तसेच एक गट फुटणं वेगळा आणि पूर्ण पक्ष पूर्ण वेगळा असेही सांगण्यात आलं, त्यावेळी कोर्टाने या सुनावणीसाठी घटनात्मक खंडपीठं असावे असेही मत व्यक्त केलं होतं. कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर 27 जुलै पर्यंत कागदपत्र दाखल करण्यासाठी वेळ दिला होता. त्यानंतरच आता उद्याची सुनावणी पार पडत आहे.
तर कोर्टातली लढाई ही आम्ही जिंकणार आहे. आता आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. त्यामुळे आमचं सरकार हे पूर्णपणे कायदेशीर मार्गाने स्थापन झालेलं आहे आणि शिवसेना आणि धनुष्यबाण आमचाच आहे. असा दावा हा एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून करण्यात येतोय. मात्र दुसऱ्या वेळेला आम्हाला कोर्टात न्याय मिळेल आणि शिंदे गटाला मोठा दणका बसेल, हे सरकार बेकायदेशीर आहे, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येतोय. महाविकास आघाडीचे नेते हे अशाच काही प्रतिक्रिया देत आहेत. मात्राचा शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा आणि कायदेशीर बेकायदेशीर कोण? हे तर सुप्रीम कोर्ट ठरवणार आहे. त्यामुळे उद्याच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.