मुंबई : आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेऊन मौजे भांबेरी, जि. जालना येथील श्री. मनोज जरांगे पाटील (Manoj Patil) यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेले आमरण उपोषण आणि त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. नरेंद्र पाटलांनी (Narendra Patil) मुख्यमंत्र्यांना दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना नरेंद्र पाटील यांना मराठा समाजासाठी लवकरच बैठक घेणार आहोत. आरक्षणासह इतर मागण्या तातडीने मार्गी लावू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना मराठा समाजाच्या अनेक मागण्या पुर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे सध्याचं नवं सरकार त्याबाबत काय पाऊलं उचलणार हे पाहावे लागेल.
आज राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांची भेट घेऊन मौजे भांबेरी, जि. जालना येथील श्री. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेले आमरण उपोषण आणि त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सकाळी मंत्रालय येथे एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर नरेंद्र पाटील यांना मंत्रिमंडळाची पहिली बैठक असल्याकारणाने मुख्यमंत्र्यांनी रात्रीची वेळ दिली होती. ज्यावेळी रात्री भेट झाली त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी उपोषणकर्ते आणि त्यांच्या मागण्या याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच तातडीने संयुक्त बैठक घेऊन मराठा समाजाच्या न्याय मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला परंतु फोन न लागल्यामुळे साहेबांनी उपोषणकर्त्यांना सदर व्हिडिओ द्वारे निरोप दिला आहे. आत्तापर्यंत मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी अनेक राजकीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत. परंतु काही मागण्या अद्याप प्रलंबित असल्याने वारंवार मराठा समाज्यातील तरुण आंदोलन करीत आहेत. काल मनोज जरांगे पाटील यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु गावाकडे पाऊस असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही.