पैठण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांची आज पैठणला सभा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. विमानतळापासून ते सभास्थळापर्यंत पोलीस तैनात असणार आहेत. 9 ते 10 हजार खुर्च्यां सभास्थळी लावण्यात आल्या आहेत. मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांचा हा मतदार संघ आहे. शिंदेगट आणि शिवसैनिकांमध्ये सुरु असलेल्या वादानंतर या सभेकडे सर्वांचं लक्ष असेल. दरम्यान या सभेला पैसे देऊन माणसं आणली जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.