नागपूर : राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व बदल झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपला गट अधिक ताकदवान करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी आता त्यांनी मिशन विदर्भची घोषणा केलीय. फडणवीसांच्या विदर्भात आता शिंदे गट मजबूत करण्यासाठी आणि उद्धव ठाकरेंना आव्हान देण्यासाठी त्यांनी कंबर कसल्याचं दिसतयं. शिंदे गटाची पुढची रणनिती ठरवण्यासाठी नागपुरात आज दुपारी एक वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय किरण पांडव यांच्यावर या पत्रकार परिषदेची जबाबदारी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाचं मिशन विदर्भ (Vidarbh) सुरु झालंय.
आज पूर्व विदर्भातील जिल्हा प्रमुखांची घोषणा होणार आहे. खा. कृपाल तुमाने, आ. आशिष जैसवाल, किरण पांडव घोषणा करणार आहेत. वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचीरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील नियुक्त्या आज जाहिर होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन शिंदे गटाची पक्षबांधणी सध्या सुरु झाली आहे.
नागपूर – मंगेश काशिकर, संपर्कप्रमुख
चंद्रपूर- बंडूभाऊ हजारे, सहसंपर्क प्रमुख
नितीन मते, जिल्हाप्रमुख
गडचिरोली- संदीप बरडे, संपर्कप्रमुख
भंडारा- अनिल गायधने, जिल्हा प्रमुख
गोंदिया – मुकेश शिवहरे, जिल्हा प्रमुख
सुरेंद्र नायडू, जिल्हा प्रमुख
वर्धा – गणेश ईखार, जिल्हा प्रमुख