मुंबई : भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरुन रणकंदन सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील असे भाजपकडून ठामपणे सांगितले जात (Sudhir Mungantiwar on Cm Post) आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी होत आहे. यावरुन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. “मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेलाच दिलं आहे. कारण देवेंद्र फडणवीस हे स्वत: शिवसैनिक आहेत,” असे सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar on Cm Post) म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी या आठवड्यात होईल. भाजप-शिवसेना एकत्र मिळून शपथ घेतील, असे सूचक वक्तव्य मुनगंटीवार यांनी केले.
“‘नाना करते प्यार तुम्हीसे कर बैठे’ असं म्हणतं शिवसेना आमच्यासोबत येईल. कारण भाजप आणि सेनेत ‘तेरे मेरे बीच मे कैसा है ये बंधन अंजना’ अशा गाण्याच्या काही ओळीतूनही त्यांनी टोलाही (Sudhir Mungantiwar on Cm Post) लगावला.”
तसेच मुनगंटीवारांना कोणत्या मंत्र्यांला कोणते खाते मिळणार याबाबत विचारले असता ते म्हणाले, “लग्नाची बोलणी आणि खाते वाटप मीडियासमोर बोलू नये.”
विधानसभा निकाल लागल्यानंतर शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरुन रणकंदन सुरु आहे. शिवसेना आणि भाजपची युती ही 50-50 या मुद्दावर झाली आहे. त्यानुसार अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री असावा अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केली आहे. शिवसेनेच्या या मागणीला स्पष्ट शब्दात नकार देत मुख्यमंत्री भाजपचा होईल असे सांगितले (Sudhir Mungantiwar on Cm Post) आहे.
‘मुख्यमंत्री मीच’
दरम्यान, काल (29 ऑक्टोबर) देवेंद्र फडणवीस यांनी “पुढील पाच वर्ष आपणच मुख्यमंत्री असू. शिवसेनेसोबत मुख्यमंत्रिपदावरुन कोणताही ठराव झालेला नाही”, असं सांगितलं. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये तणाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वादानंतर सेना-भाजपची कालची बैठक रद्द झाली. शिवाय शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांचा जुना व्हिडीओ शेअर करुन, ठरलेल्या फॉर्म्युल्याची आठवण करुन देण्यात आली.
शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद?
दरम्यान, भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाऐवजी उपमुख्यमंत्रिपद देऊ केलं आहे. याशिवाय 16 मंत्रिपदेही देण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे. मात्र मुख्यमंत्रीपद देण्यास भाजपने स्पष्ट नकार दिला आहे.
संबंधित बातम्या :
शिवसेना-भाजपच्या 6 दिग्गजांचा मंत्रिपदावर डोळा, औरंगाबादमधून कुणाची वर्णी लागणार?
2014 आणि 2019 मध्ये मला संधी दिल्याबद्दल आभार, मी पुन्हा येणार, जोमाने काम करणार : देवेंद्र फडणवीस
शिवसेना-भाजपचा शपथविधी एकत्र होणार का? गिरीश महाजन म्हणतात…
उपमुख्यमंत्रिपदासह 16 मंत्रिपदे, भाजपची शिवसेनेला ऑफर, मुख्यमंत्रिपद नाहीच!