‘रोहित, तू काळजी करु नको, मुलांनाही तसं सांग’, मुख्यमंत्र्यांचा शब्द

| Updated on: Mar 13, 2020 | 11:30 AM

आमदार रोहित पवार यांनी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. Uddhav Thackeray assures Rohit Pawar Mahapariksha Portal

‘रोहित, तू काळजी करु नको, मुलांनाही तसं सांग’, मुख्यमंत्र्यांचा शब्द
रोहित पवार आणि उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : “रोहित तू काहीही काळजी करु नको आणि मुलांनाही तसं सांग. यापुढे होणारी भरती प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल”, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray assures Rohit Pawar Mahapariksha Portal) यांनी दिल्याची फेसबुक पोस्ट, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी लिहिली. रोहित पवार (Uddhav Thackeray assures Rohit Pawar Mahapariksha Portal) यांनी महाभरतीची प्रक्रिया महापोर्टलऐवजी ऑफलाईन पद्धतीने घ्यावी यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी फेसबुक पोस्ट लिहून, त्याबाबतची माहिती दिली.

लवकरच महारभरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे. त्याची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. ही भरती ऑफलाईन पद्धतीनेच होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचा दावा रोहित पवारांनी या फेसबुक पोस्टमध्ये केला आहे. तसंच मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनामुळे मी त्यांचे आभार मानतो, असंही रोहित पवारांनी म्हटलं.

रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी

राज्यात लवकरच महाभरतीची प्रक्रिया सुरु होणार असून त्याबाबतची तयारीही अंतिम टप्प्यात आली आहे. पण आधीच्या ‘महापोर्टल’च्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या नोकर भरतीचा वाईट अनुभव लक्षात घेता राज्यातील तरुणांचा ऑनलाइन नोकरभरतीला तीव्र विरोध आहे. अनेक तरुणांनी मला, अन्य आमदारांना व नेत्यांना भेटून ऑफलाईन भरती करण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करण्याची मागणी केली होती.

त्यानुसार काल मुख्यमंत्री श्री. उद्धव जी ठाकरे साहेब यांची वैयक्तिकरित्या भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तरपणे या विषयावर चर्चा केली. यावेळी त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत मला आश्वस्त केलं. ते म्हणाले, “रोहित याबाबत तू काहीही काळजी करु नको आणि मुलांनाही तसं सांग. यापुढे होणारी भरती प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल.”

मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या या आश्वासनामुळे मी त्यांचे आभार मानतो. यामुळे अधिकाधिक तरुणांना नोकरभरतीच्या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. याशिवाय भरती करताना एका दिवशी एकाच पदासाठी संपूर्ण राज्यात परीक्षा घेण्यास सरकार प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलं.

तसंच पूर्वी महापोर्टलवर नोंदणी केलेल्या तरुणांनाही या भरतीत प्रक्रियेत सामावून घेण्यात यावं आणि ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’तील सदस्यांच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात आणि ‘एमपीएससी’च्या माध्यमातून जी पदं भरली जातात त्या पदांची रखडलेली भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणीही यावेळी मुख्यमंत्री महोदयांकडे केली. यावरही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

संबंधित बातम्या 

नोकर भरतीबाबत सरकारकडून अध्यादेश जारी, महापोर्टल बंद होणार? 

तातडीने महापरीक्षा पोर्टल बंद करावं, अन्यथा धडक मोर्चा : सत्यजीत तांबे