मुंबई : महाविकासआघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (7 मार्च) अयोध्या दौऱ्यावर (Saamana Editorial) आहेत. अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. “जाहिरातबाज राजकारण्यांचे मुखवटे गेल्या शंभर दिवसात फाटलेच आहेत. त्या मुखवटेबाजांचे होळी करुन मुख्यमंत्री ठाकरे अयोध्येस निघाले आहेत,” अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
“काही सरकार फक्त दिवस ढकलतात (Saamana Editorial) किंवा मोजत बसतात. पंधरा दिवसांचा टप्पा पार केला तरी जाहिरातरुपाने उत्सव साजरा करतात. अशा जाहिरातबाज राजकारण्यांचे मुखवटे गेल्या शंभर दिवसात फाटलेच आहेत. त्या मुखवटेबाजांचे होळी करुन मुख्यमंत्री ठाकरे अयोध्येस निघाले आहेत. उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा हा कोणत्याही मतलबाशिवाय आहे.”
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अयोध्या नगरीच्या मनामनांत आहेत याचा अनुभव आम्ही अनेकदा घेतला आहे. स्वतः उद्धव ठाकरे हे अयोध्येत जात आहेत ते त्याच एका श्रद्धेने. हातात सत्ता नव्हती तेव्हाही ते रामचरणी गेले. आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावरही ते अयोध्येत जात आहेत ते त्याच नम्र भावाने.”
“महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, महिला, आबालवृद्ध हे सुखाने नांदावेत, राज्यात एकात्मता आणि बंधुभाव नांदावा अशी प्रार्थना ‘ठाकरे सरकार’ रामचरणी करतील. हे राज्य श्रींचे आहे. म्हणजे छत्रपती शिवरायांचे आहे. ते छत्रपतींच्या न्यायबुद्धीने, तितकेच श्रीरामांच्या सत्य मार्गाने चालेल. जनतेला दिलेल्या वचनांना जागणारी कर्तव्यबुद्धी सरकारच्या विचारात असणे हेच रामराज्य ठरते. हेच राज्य महात्मा गांधींना हवे होते. महाराष्ट्रात त्याच विचारांचे राज्य चालले आहे. ते तसेच चालत राहील. पाठीशी श्रीराम आहेतच!”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा, शिवसेेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन
“महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने रामराज्य सुरु झाले. त्यास शंभर दिवस झाले. हे सरकार 100 तासही चालणार नाही असे दावे ऐंशी तासवाले करीत होते. त्यांना तसेच बोंबलत ठेवून सरकारने शंभर दिवसात बरेच काही करुन आणि घडवून दाखवले. जनतेच्या मनात जी अविश्वासाची किरणे होते. त्यांचे रुपांतर विश्वासाच्या किरणात करण्याची किमया ठाकरे सरकारने शंभर दिवसांत केली. त्यामुळे शंभर दिवसांचे संचित घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत जात असतील आणि श्री रामाच्या चरणी कार्याची फुले अर्पण करणार असतील. तर त्यांचे स्वागत करायला हवे,” असेही सामनाच्या अग्रलेखात (Saamana Editorial) म्हटलं आहे.