मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांना लीलावती रुग्णालयात दाखल केलं आहे. अनिल परब यांना कोरोनाची लक्षण असल्याने त्यांना लीलावतीत दाखल केल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सावध पावित्रा घेत मुंबईतील आमदारांची बैठक रद्द केली आहे. (CM Uddhav Thackeray Cancelled Meeting with MLA After anil parab tested corona Positive)
परिवहन मंत्री अनिल परब यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आलं होतं. मात्र त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल केलंं आहे. सध्या त्यांच्यावर लिलावतीत उपचार सुरु आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील आमदारांची बैठक रद्द केली आहे.
कोरोना, अनलॉकसह इतर राजकीय विषयांवर चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आज वर्षा निवासस्थानी आमदारांची बैठक बोलवली होती. यात मुंबईतील आमदार सहभागी होणार होते. मात्र अनिल परब यांना कोरोना झाल्याचे समजताच मुख्यमंत्र्यांनी सावध पावित्रा घेतला आहे. त्यांनी वर्षावर बोलवलेली आजची बैठक रद्द केली आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनिल परब हे सतत फिल्डवर काम करत आहे. त्या दरम्यान त्यांनी अनेक मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावली होती. तसेच काही आमदारांच्याही भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही बैठक रद्द केल्याचं बोललं जात आहे. (CM Uddhav Thackeray Cancelled Meeting with MLA After Anil Parab tested Corona Positive)
संबंधित बातम्या :
उद्धव ठाकरे राज्यपालांवर कडाडले, मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील मोठे मुद्दे
माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, उद्धव ठाकरे राज्यपालांवर बरसले