मुंबई : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत नाही तोपर्यंत तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचे बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिला आणि बाल विकास विभागासोबत बैठक घेतली. कोरोनाचा आजार वेगळा आहे. तो अंगावर काढू नका. कोरोना औषधांचा अनाठायी वापर टाळायला हवा, असा सल्ला ही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला. (CM Uddhav Thackeray caution about Corona Third wave)
“कोरोनाचा आजार अंगावर काढू नका”
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता अधिक आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. काही दिवसांनी राज्यात पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात होईल. त्यामुळे पावसाळ्यात सर्वाधिक काळजी घेणं गरजेचे आहे, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले. तसेच कोरोनाचा आजार अंगावर काढू नका. कोरोना औषधांचा अनाठायी वापर टाळायला हवा, असा सल्ला ही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला.
कोरोनाचा विषाणू अधिक झपाट्याने पसरतो आहे. त्यामुळे काळजी घ्या. कोणालीही बंधनात राहणे आवडत नाही, पण काळजी घेणे गरजेचे आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी सूचना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज महिला आणि बाल विकास विभागासोबत बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनापासून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी काही सूचना दिल्या. तसेच कोरोनामुळे दोन्ही किंवा एका पालकाचा मृत्यू झाला असेल तर बालकांबाबत विभागाने धोरण निश्चित करावे. या बालकांना संगोपनापासून शिक्षणापर्यंतचे लाभ कसे देता येतील, याची माहिती द्यावी, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या सूचना
?टास्कफोर्समधील बालरोगतज्ज्ञ आणि महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांत संवाद घडवून आणावा.
?या संवादात बालकांना कोरोनापासून कशाप्रकारे सुरक्षित करता येईल याचे मार्गदर्शन करावे.
?विभागाचा बालकांसंदर्भातील अनुभव आणि माहितीची देवाणघेवाण करावी.
?यासंदर्भातील उपाययोजनांचा मार्गदर्शक सूचनांमधे समावेश करावा.
?कोरोनामुळे दोन्ही किंवा एका पालकाचा मृत्यू झालेल्या बालकांबाबत विभागाने धोरण निश्चित करावे.
?अशा बालकांना संगोपनापासून शिक्षणापर्यंतचे लाभ कसे देता येतील याची माहिती द्यावी.
2. Establish lines of communications between the Pediatric Task Force and officials from the Department of Women and Child Development
3. Chart mandatory guidelines & measures for the future functioning
4. Exchange information and experiences regarding child care
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 29, 2021
माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून कुटुंबांचे सर्वेक्षण झालं आहे. या सर्वेक्षणाची संपूर्ण माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. त्यात बालकांची माहिती ही समाविष्ट आहे. यामधील कमी वजनाच्या बालकांकडे अधिक लक्ष देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असंही मुख्यमंत्री म्हणाले. ग्रामीण, आदिवासी तसेच शहरी भागातील बालकांचे कुपोषण कमी करण्याच्यादृष्टीने आयसीडीएसची पुनर्रचना करण्यासंदर्भात विभागाने प्रस्ताव सादर करावा, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. (CM Uddhav Thackeray caution about Corona Third wave)
संबंधित बातम्या :
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बालकांना सुरक्षित ठेवा, मुख्यमंत्र्यांचा टास्कफोर्सला महत्वाचा सल्ला
कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना सरकार आधार देणार?, यशोमती ठाकूर यांचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव