मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात, देवेंद्र फडणवीस यांची कर्जमाफीवर टीका

| Updated on: Dec 21, 2019 | 5:56 PM

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची, सातबारा कोरा करण्याची मागणी होती. मात्र तो शब्द हे सरकार पाळत नाहीत असे (Devendra fadnavis criticizes CM uddhav Thackeray) फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात, देवेंद्र फडणवीस यांची कर्जमाफीवर टीका
Follow us on

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मोठी घोषणा (Devendra fadnavis criticizes CM uddhav Thackeray)   केली. यानुसार राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. या कर्जमाफीसाठी कोणत्याही अटी नसल्याची  माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं. कर्जमाफीची ही घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोध दर्शवत सभात्याग केला. “शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची, सातबारा कोरा करण्याची मागणी होती. मात्र तो शब्द हे सरकार पाळत नाहीत,” असे (Devendra fadnavis criticizes CM uddhav Thackeray) फडणवीस म्हणाले.

“शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी होती. सरसकट कर्जमाफीचा शब्द होता. सातबारा कोरा करण्याचा जो शब्द होता. तो शब्द हे सरकार पाळत नाही. हे सरकार पुन्हा एकदा एकीकडे 25 हजाराचा विश्वासघात आहे. दुसरीकडे सातबारा कोरा हे वचन पाळलं जात नाही. म्हणून या सरकारचा निषेध करतो आणि सभात्याग करतो.” असे फडणवीस सभागृहात म्हणाले. यानंतर पत्रकार परिषद घेतही त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

“अधिवेशनात तिघाडी सरकारच्या वतीने मुख्यमंत्री अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना जी घोषणा केली. जनादेशाला विश्वासघात करत हे सरकार सत्तेत आलं. ती विश्वासघाताची मालिका पुढे नेत, शेतकऱ्याचा विश्वासघात करण्याच काम केलं अशी टीका देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis criticizes CM uddhav Thackeray) यांनी केली.”

“आता तातडीची मदत देण्याची आवश्यकता होती. दीड लाख ते दोन लाखात फक्त 8 लाख शेतकरी येतात. असेही ते म्हणाले.”

“कर्जमाफी जाहीर करताना त्याची काहीही माहिती दिली नाही. 2 लाख रुपयात कर्जमाफीत सातबारा कोरा होत नाही. त्यामुळे ठाकरे सराकारच्या कर्जमाफीत स्पष्टता नाही. कर्जमाफीत नेमका फायदा किती याबाबतही शेतकऱ्यांना संभ्रम आहे,” असेही फडणवीस म्हणाले.

“आमच्या सरकारने दीड लाख कर्जमाफी दिली होती. केवळं त्यात सरकारी नोकर वगळले होते. त्यात आम्ही सर्व वगळले होते. आम्ही पीक कर्ज आणि थकीत कर्ज माफ केलं होतं. यात सर्वात महत्त्वाचं होतं. दीड लाखाच्या पुढील शेतकरी यासाठी योग्य ठरतील. याचा फायदा 8 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. असेही ते म्हणाले.”

‘विदर्भाकरिता कोणतीही घोषणा नाही’

“उद्धव ठाकरेंनी विदर्भाकरिता कोणतीही नवीन घोषणा केली नाही. विदर्भात पहिले अधिवेशन झाले. त्यांच्याकरिता कोणतीही मोठी घोषणा केली नाही. त्यामुळे विदर्भाची निराशा झाली. अशीही टीका केली.”

“प्रामाणिकपणे पवारांनी काय कुठल्याही नेत्यांनी सांगितलं तरीही पवारांनी व्यक्त केलेली आजची कुठलीच घोषणा ती भावना व्यक्त करणारी नाही. त्यांचाही भ्रमनिराश झाला असेल. पण ते सांगणार नाही. कारण ते अस दुखणं आहे जे सांगता येत नाही. पण त्यांचाही भ्रमनिराश झाला असणार असेही ते (Devendra fadnavis criticizes CM uddhav Thackeray) म्हणाले.”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार 30 सप्टेंबर 2019 पर्यंतची कर्जमाफी होणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “ज्या गोरगरिब शेतकऱ्याचं 30 सप्टेंबर 2019 पर्यंत कर्ज थकीत आहे. त्या शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं संपूर्ण कर्ज माफ केलं जाईल. मी आज महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा करतो. ही योजना मार्चपासून लागू होईल. मधले दोन महिने सरकारला तयारीसाठी पाहिजे आहेत. ही संपूर्ण योजना पारदर्शक असेल. या योजनेतील पैसा थेट शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जाईल. याला कोणत्याही अटी शर्तींचा अडथळा येणार नाही.”